पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/50

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


球く आईबापांचा मित्र. १९ मुलांस निष्कारण त्रास केव्हांही देऊं नये. कारण आईबाप आपल्यास उगीच त्रास देतात, अशी मुलांची भावना झाल्यास, तीं त्यांस उगीच त्रास देऊं लागतात. यामुळे बारीकसारीक कामांत सुद्धां रिकामें द्वैत वाढत जातें व एकाचे तोंड उत्तरेस तर दुसच्याचें दक्षिणेस असें होण्याचा प्रसंग येतो, असें दिसल्यास आपण त्या गोष्टीबद्दल आपला तिरस्कार दाखवावा, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा, वृथा वाद वाढवू नये, ह्मणजे मुलांच्या खभावांत बहुधा बदल होईल. योग्य वेळीं केलेले प्रयत्न फुकट जाणार नाहींत, मात्र रागाच्या खाधीन होऊन भलती किंवा जबर शिक्षा सहसा करूं नये. २० एखादा मुलगा जेवायास योग्य वेळीं येत नसला, तर आईनें चरफडून किंवा अपशब्द बोलून आपल्या मनास उगीच त्रास करून घेऊं नये, किंवा मुलाशीं हातपिटीस येऊं नये. योग्य वेळीं न आल्यास कांहीं तरी तोटा होतो, असें त्याच्या प्रत्ययास आणून द्यावें, ह्मणजे योग्य वेळीं येण्यास तो चुकणार नाहीं. लहान मुलास आई भरविते, त्याप्रमाणें मध्यम वयाच्या मुलासही भरविते, पण लहान मुलास केवळ त्याच्या कलाप्रमाणें वागून ‘काऊ काऊ चिऊ चिऊ' करून जेवण घालते, त्याप्रमाणें मध्यम वयाच्या मुलास घालू नये. तो आपल्या कलाप्रमाणें वागेल, आपलें ह्मणणें ऐकेल, तर त्यास भरवावें, अव्यवस्थित वागेल तर भरवू नये. ह्मणजे वेळच्यावेळीं येण्यास त्यास एवढेही अँोषध पुरेंसें होईल. अयोग्य वेळीं आल्यास आई भरवीत नाहीं, किंवा आपलें पान आपल्यास मांडून ध्यावें लागतें, किंवा उष्टं काढावें लागतें, असें ह्यास कळलें, ह्मणजे याच गोष्टी त्याच्या अनियमित वर्तनास आळा घालण्यास उपयोगीं पडतील. मुलगा मोठा असून तो नियमित वेळीं येत नसला, तर त्याच्याकरितां इतर मंडळीनें खोळंबूं नये. एखादे वेळीं थोडी वाट पादविी, त्यास ताकीद द्यावी, ह्मणजे तो ताळ्यावर येईल. योग्य कारण नसेल तर वाट पाहाण्याचे कारण नाहीं. आपलीं जेवणे आटोपून घ्यावीं. मुलास जेवणाचा फांका बसला, निवालेलें जेवण -