पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


३ मुलांच्या कल्याणाचेच विचार अक्षय करीत असतो, तो बाप त्या मुलास नावडता कां व्हावा ? केवळ उभयतांच्या गैरसमजामुळे पुष्कळ वळी असे प्रकार घडतात. आईवापांनीं सौम्यपणाचे वर्तन ठेवल्यास व सारासार विचार केल्यास, असे प्रसंग टाळतां येतील. - ६ मुलगा वयांत येऊं लागला, ह्मणजे त्याचे व बापाचे बहुधा बिनसावयाचे, असा प्रकार हृल्लीं फार आढळतो. आईचे न ऐकणारी मुलें लहानपणापासूनच दृष्टीस पडतात. मुलगा शिकून तयार झाल्यावर, त्याचे व बापाचें न जमल्यास तो प्रकार वेगळा. कारण उभयतांच्या शिक्षणांत अंतर असल्यामुळे, उभयतांच्या मतभेदाचा तो परिणाम असें ह्मणतां येईल; पण लहानपणीं असें कांहीं कारण नसतां उद्भवणारें द्वैत चांगलें नाहीं. त्यास आळा घालतां येईल तितकें चांगलें. ७ काय करावें मास्तर, मुलगा आमचे ऐकत नाहीं, बिलकूल ऐकत नाहीं; असें ह्मणणारीं आईबापं हल्लीं बरीच आढळतात. आतां हें खरें कीं त्यांतून किलेकांचे गान्हाणें उगीचही असेल. पण गान्हाणें पुष्कळ वेळां ऐकावयास येतें खरें. हा काय चमत्कार आहे ? यक्षिणीनें कांडी फिरवावी त्याप्रमाणें-कांहीं अद्भुत प्रभावानें किंवा कलियुगाच्या बळानेंसर्वच मुलें अशीं उत्पन्न झालीं काय ? परंतु या कुरकुरींत कांहीं अथे नाहीं. ‘कांहीं गुण स्वागीचा व कांहीं सोनाराचा !’ तसाच यांतही मुलांच्या बरोबरीनें आईवापांचा दोष असण्याचा संभव आहे. आपल्यांत असा कांहीं दोष असल्यास, तो आईवापांनीं काढून टाकावा, हें योग्य आहे. ८ मुलांस वागविण्यांत, योग्य ती व्यवस्था आईबापांच्या हातून होत नाहीं, यामुळे हे दोष पुष्कळ ठिकाणीं उत्पन्न होत असावे, अशी अटकळ करण्यास जागा आहे. आईबापांनीं योग्य ती प्रयत्न केल्यास असे दोष टाळतां येतील. कित्येक ठिकाणीं मुलांचे स्वभाव वाईट असतील, पण सर्वच ठिकाणीं मुलांचे स्वभाव वाईट, असें ह्मणतां येणार नाहीं. ह्यातारीं मनुष्यें सर्व दोष कलियुगावर ढकलून मोकळीं होतात; किंवा दैववादी बनून-होणार तें चुकावयाचे नाहीं-अशी मनाची समजूत करून घेतात, पण हें बरोबर नाहीं. ज्यांचीं मर्ने शिक्षणार्ने विकास