पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग दुसरा. Rও द्वेष उत्पन्न होईल, असा प्रयत्न निरंतर चालवावा. आपण जरी वाईट शब्द उचारले नाहीत, तरी भॉवतालच्या मनुष्यांच्या सहवासानें तीं वाईट शब्द शिकतील; पण ते आपणांस आवडत नाहींत, असें आपण त्यांस दाखवल्यास, ते त्या मार्गापासून परावृत्त होतील. वाईट शब्द न उच्चारणें, हें वाचिक तप आहे. तें आपल्यास सहज साधून, त्यापासून आपल्या संततीचेही हित होईल. १७ संततीच्या चांगल्या मनोवृत्तींस वळणं मिळावें, वाईट मनोवृति मुळाशींच सुकाव्या, अशी योजना करावी. एकसारखें मुलांस मारणें, किंवा त्यांच्यांतील कमतरपणाबद्दल त्यांस हिणावणे, त्यांस कांहीं कळत नाहीं, असें वारंवार ह्मणणें, चांगलें नाहीं. कारण त्यापासून पुष्कळ वेळां त्यांची नाउमेद होते व उत्साह नाहींसा होतो. खाभाविक कमतरपणास कोणाचाच इलाज नाही. त्यावर टीका करण्यांत अर्थ नाहीं. ज्या गोष्टींत सुधारणा होण्यासारखी असेल, त्या गोष्टीबद्दल प्रयत्न करावयाचा. टींचून बोलण्यापेक्षां ममतेनें बोलावें. प्रोत्साहन देऊन विशिष्ट वळण त्यांस लावण्याचा प्रयत्न करावा. १८ मुलांवर दाब असावा हें खरें आहे, पण तो दाब आपल्या सद्वर्तनाचा असावा. दाब ह्मणजे भीति नव्हे. वाघ एकदा ओरडला ह्मणजे वनपशु अगदीं गुपचुप बसतात. पण वाघ व वनपशु यांचा संबंध प्रेमाचा नसतो. आईबापांस पाहून मुलांस अशी भीति वाटत असल्यास, असा दाब कांहीं उपयोगाचा नाहीं. तो हितपरिणामी होणार नाहीं. तो दाब आईबापांच्या दृष्टीसमोर किंवा गजैनेपुरता मात्र राहील. मुलांवर दाब ठेवणें ह्मणजे मुलांस काचांत ठेवणें नव्हे. आईबापांस पाहिल्याबरोबर मुलांस आनंदाचें भरतें आलें पाहिजे, व मुलांच्या हातून कांहीं वाईट काम घडलें असल्यास, आईबापांच्यापुढे येतांना त्यांच्या माना लाजेनें खालीं झाल्या पाहिजेत. एरव्हीं खांचे चेहरे प्रफुल्ल असले पाहेिजेत, त्यांच्या ठिकाणीं सद्विचारांचा उदय झाला पाहिजे व वाईट विकार आईबापांच्या दर्शनानें पार मावळून गेले पाहिजेत. Yf