पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा- ३३ ९ लहान मुलांस दुखणें आल्यास आईबापांस फार कष्ट सोसावे लागतात. मुलें त्रास देतात, किरकिर करितात, पण आईबापांनीं मन शांत ठेवून त्यांची निगा करावी. आई जपून वागल्यास मुलांस फारसें दुखणें येणार नाहीं. बारीकसारीक दुखणें लयांस विश्रांति दिल्यानें व थोड्याबहुत निगेनें किंवा साधारण औषधानें बरें होईल. तसें न झाल्यास अनुभविक वैद्याची किंवा डाक्तराची मदत घ्यावी. १० मुलांस प्रेमानें वागवावें, उगीच त्रास देऊं नये, ही मुख्य गोष्ट. पण त्यांस चांगल्या मार्गास लावण्याचे प्रयत्न अगदीं लहानपणापासून करावे. वाईट संवय लागण्यास वेळ लागणार नाहीं. एकदा वाईट संवय लागल्यावर ती बळावत जाते, मग तिचाच दुर्गुण बनतो. याकरितां प्रथमपासूनच वाईट संवय लागूं नये ह्यणून जपत असावें. कठोर उपाय एकदम योजूं नयेत. सौम्य उपायांचा खीकार करावा. प्रेम, प्रसंगाप्रमाणें कमीजास्त दाखवल्यास, बरेंच काम साधेल. ११ मुलाच्या साधारण प्रवृत्तीस विनाकारण आड येऊं नये. परंतु तिच्यापासून दुर्गुण उत्पन्न होण्याचा संभव दिसल्यास तिचा प्रतिकार अवश्य करावा. मुलाच्या प्रवृत्तीस आपण निष्कारण आड अाल्यास मुलगें उलट खभावाचें बनण्याचा पुष्कळ वेळां संभव असतो. हें एखादें बारीकसें उदाहरण पाहिल्यानेंही लक्षांत येण्यासारखें आहे. मूल रांगूं लागलें, ह्मणजे तें प्रथम घरांतील सपाट जागेवर रांगूं लागतें. थोड्या वेळानें उंबरठे वलांडू लागतें, व शेवटीं पायच्या उतरून पलीकडे जाऊं लागतें. अशा वेळीं त्याच्यावर लक्ष ठेवण्यास मनुष्य असण्याची जरूरी असते. पण मूल पायच्यांशीं गेल्यावर, एखादी आई जर त्यास तेथून उचलून मार्गे आणून ठेवू लागली, तर जसा-आघाताच्या प्रमाणांत प्रल्याघात होतो-लयाप्रमाणे-मूल लागलेंच फिरून पाय-यांच्या टोंकावर रांगत जाईल, व पायच्या उतरण्याचा प्रयत्न करूं लागेल. जों जों आपण त्यास अडथळा अधिक करूं, तों तों तेंही अधिक हट्टानें आपला