पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


३० आईबापांचा मित्र. सुद्धां केव्हां केव्हां आई झाल्यावर मागल्या गोष्टी विसरते; मुलास वेळच्यावेळीं खावयास घेत नाहीं, तें रडून आकांत करीपर्यंत त्यास उचलून घेत नाहीं, याला काय ह्मणावें! आतां ह्या गोष्टी ती मुद्दाम करते, असें ह्मणणें नाहीं. केव्हां केव्हां अज्ञानानें करीत असेल, केव्हां केव्हां कामाच्या गदांमुळे करीत असेल, केव्हां केव्हां खाभाविक दुर्लक्ष होत असेल, किंवा प्राप्त वस्तूचा आदर खाभाविक कमी होतो, त्याप्रमाणे होत असेल; कसेंही असलें तरी तो दोषच, तो टाळण्याकरितां प्रयत्न केला पाहिजे. ४ तिच्या अांगावर मुलांचे पोषण व्हावयाचे, ह्मणून तिनें आपलें खाणेंपिणें नियमित ठेवावें; चांगलें ह्मणजे खच्छ व-मिळेल त्या मानानें पौष्टिक-पण पथ्यकर व प्रकृतीस मानणारें अन्न खावें, पण हा नियमितपणा ती राखीत नाहीं. वाटेल ते पदार्थ खाते, यामुळे ती मुलांचे नेहमीं नुकसान करिते व केव्हां केव्हां आपल्या खतांच्या प्रकृतीचेही नुकसान करून घेते. तिला खतांला जे पदार्थ ब*त नार्हति, ते त्या लहान मुलांस बाधतात, हें तिच्या लक्षांत येत नाहीं. मुलांस आंगावर पाजल्यामुळे तिच्या आंगांतील रक्त कमी होतें; याकरितां जितकें रक्त कमी व्हावयाचे त्यापेक्षां अधिक तिच्या आंगांत उत्पन्न झालें पाहिजे, नाहीं तर तिची प्रकृति दिवसंदिवस क्षीण होत जाईल; याकरितां तिणे खाणेंपिणे चांगलें खावें. *"सत"स, फारसे करूं नयेत. मुलांचे संगोपन तिच्या निरोगीपणावर अवलंबून आहे, याकरितां तिनें आपल्या प्रकृतीस जपावें, ह्मणजे मुलांचे संगोपन सहज होईल. तिनें आपला खभाव शांत ठेवावा. ती केव्हां केव्हां उगीच आकांडतांडव करिते व आपलें *स तापवून घेते, त्याचा परिणाम त्या कोमल अर्भकांवर फार वाईट घडतो. मुलगें रडू लागलें तर त्यास उचलून घ्यावयाचें तें न घेतां एखादी आई उलट त्यास गालगुचे घेते, किंवा चापटी लगावते, हें तर फारच वाईट. ‘वड्याचे तेल वांग्यांवर अशांतला जरी हा प्रकार घडत असला, तरीही तो वाईटच-नको-पाहिजे आईनें आपले मनोविकार कधीही क्षुब्ध होऊं देऊं नयेत. मनोविकारांचे परिणाम