पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. २९ वाढ ह्मणजे आईची झीज, असें सहजच सिद्ध होतें. तरी ही झीज सोसण्यास आई सर्वकाळ तयार असते. हें केवळ तिच्या निसर्गसिद्ध प्रेमानें घडतें. आई कधीं प्रसूतिवेदनांनी किंवा या झिजेमुळे अशक्त होते, तरी आपल्या आपल्यानें सुखी असावेंआपलें कांहींही होवो-ही तिची इच्छा कायम असते. यावरून आईचें प्रेम केवढे आहे, याची कल्पना होईल,. तशीच आईच्या योग्यतेबद्दलही होईल. २ बापाचीही संततीकरितां झीज सोसण्याची तयारी असते, पण ती अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष झीज आईसच सोसावी लागते. ईश्वरी नियमही या गोष्टीस अनुकूळ दिसतो. कांहीं लहान लहान प्राण्यांत पोरें उपजल्यावर आई मरते. विशेष सुधारलेल्या प्राण्यांत आईच्या अांगावर त्यांचे जीवन चालतें. आई ही झीज प्रेमानें सोसते हें खरें, पण किल्लेक वेळां अज्ञानानें मुलांशीं वागण्यांत तिच्याकडून व केव्हां केव्हां आईबापांकडून पुष्कळ दोष घडतात. यामुळे त्यांच्या प्रेमाचा पुष्कळ वेळां दुरुपयोग घडतो. प्रेमांत किंवा प्रेमाच्या वागणुकींत थोडा कमीपणा झाल्यास संततीची योग्य जीपासना होणार नाहीं, व अधिकपणा झाल्यास संततीवर त्याचा चांगला परिणाम होणार नाहीं-ह्मणजे मुलें सद्गुणी न होतां बेताल होतील. यामुळे त्यांच्या आईबापांस सुख होणार नाहीं व संततीसही सुख होणार नाहीं; याकरितां आईबापांनी मुलांशीं कशी वागणूक ठेवावी, याबद्दल थोडासा विचार करण्याचे योजिलें आहे. ३ आईबापांनी आपल्या संततीवर योग्य प्रेम करावें, ह्मणजे तें प्रेम मयोदित असावें. अगदीं लहानपणीं मुलांचा संबंध आईशीं अगदीं निकट असतो. बापाशीं पुढे थोडथोडा जडत जातो. मूल नेहमीं आईच्या जवळ असणार, तिच्या अांगावर पिणार व तिच्याशीं खेळणार. आई त्यास वेळच्यावेळीं खावयास घेत असली, रडवीत नसली, तर मुलगें तिरसट निघणार नाहीं. पण जी आई मुलगें होण्यापूर्वी मुलाकरितां आतुर झालेली असते,-धर्मभोळी असल्यास पिंपळाचे पार झिजविण्यास कमी करीत नाहीं-ती