पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

スマ आईबापांचा मित्र. २ बाळकडूची करंडी अलीकडे-विशेषत: शहरांतून-अगदीं नाहींशीच झाली आहे ! कोणत्याही दुखण्यावर वेळेवर उपचार झाले पाहिजेत, नाहींतर ती दुखणीं बळावण्याचा संभव असतो. किरकोळ आजारांवरील आरंभीचे उपचार आयांस माहीत असावे, ह्मणजे मुलांस दुखणीं येतांच लया घाबरणार नाहीत. तसें नसलें ह्मणजे संततीचें दु:ख पाहून त्यांचीं अांतडीं नुसतीं तुटतील, पण त्यामुळे संततीचे दु:ख तिळभरही कमी होणार नाहीं. पाण्यांत पडलेल्या मनुध्याकडे पाहून कडेवर राहून नुसत्या हळहळणाच्या माणसांचा, पाण्यांत बुडणा-या माणसास जसा उपयोग होत नाहीं, त्याप्रमाणे असल्या अज्ञान आईबापांचा संततीस उपयोग होणार नाहीं. ह्मणून संततीच्या संगोपनीचे व त्यांस औषधपाणी देण्याचे साधारण ज्ञान आईबापांनीं-विशेषत: आयांनीं-अवश्य करून घ्यावें. ९ व्यसनांपासून दूर राहावें. १ कोणतेंही व्यसन नसणें चांगलें. कारण त्यापासून कोणताही लाभ होत नाही. तरी व्यसनाधीन माणसें फार आढळतात. इतकेंच नव्हे तर आपल्या व्यसनांचा गौरव करावा, असेंही किलेकांस वाटतें. आतां हें खरें की, जगांत निरर्थक वस्तूच जर नाहीं तर अंमल उत्पन्न करणारे लहानमोठे पदार्थ तरी निरुपयोगी कसे असतील ? पण ते निर्वाहास लागणाच्या अगत्याच्या पदार्थात तरी येत नाहीत, हें प्रलेकानें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. सामथ्र्यानुरूप बारीकसारीक व्यसनें फारशीं बाधा करीत नाहीत हें खरें, पण ती व्यसनेंच; व ती नसतील तितकीं चांगलीं, असें ह्मणण्यास प्रत्यवाय नाहीं. २ जवळ तपकिरीची डबी ठेवून तिची चिमटी वरचेवर ओढणें, तंबाखची चिमटी वरचेवर तोंडांत टाकणे, विड्यांचे जुडगेच्या झुंड पार करणे, किंवा चहाकाफीचा फन्ना पाडणे, ही मोठींशी व्यसनं नहत, असें किखेक ह्मणतात. पण जेव्हां त्यावांचून अङ्गं लगते, ती सुटत नाहीत, ती न मिळाल्यास प्रकृतीवर वाईट