पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग पहिला. २१ एकमेकांचे खभाव एकमेकांस पुष्कळ वेळां पटत नाहीत. पण प्रथम स्वभावांची ओळख करून घेऊन मग विवाह केल्यास ही अडचण टाळितां येईल. पुढे संतति होऊं लागली, ह्मणजे ती मनासारखी, बेताची, होईल असा काय नियम आहे ? तेव्हां ती कशीही झाली, तरी तिची जबाबदारी उभयतांनीं पतकरली पाहिजे. नाहीतर एकमेकांवर दोषारोप करून झगडण्यांत नफा कोणता ? ह्मणून या बाबतीतही आधीं विचार झालेला असल्यास बरा. प्रथम जी प्राप्ति असते, ती पुढे वाढतेच, असाही नियम नसतो. पैसा कितीही मिळाला तरी पाहिजे असतो, पण तो मिळाला पाहिजेना ! मिळाल्यास ठीकच आहे, पण न मिळाल्यास असलेल्या पैशांत काटकसर करून राहिलें पाहिजे. पण याचा विचार पूर्वी झाला नसल्यास या गोष्टी पुढे फार कठीण पडतात. संसार ह्मणजे केवळ सुखाचे साधन अशी कल्पना असते, यामुळे रोजच्या व्यवहारांत अंमळ इकडचे तिकडे झालें की घडी बिघडली असें वाटतें, किंवा किरकोळ विन्नांनीं सुद्धां घाबरगुंडी उडते; पण संसाराची यथार्थ कल्पना पूर्वीच मनांत ठसली असल्यास व संसाराबरोबर येणा-या जबाबदाच्यांची ओळख पूर्वी पटली असल्यास, तितकें अवघड वाटणार नाहीं. ८ मुलांचे संगोपन करावयास शिकावें. १ आईबापांस विशेषेकरून आयांस-मुलांचे संगोपन कसे करावें याचे थोडेंबहुत ज्ञान असावें. पुरुष बहुधा वाहेरच्या कामांत गुंतलेले असतात, घरांतलें काम बायकांकडे असतें. तेव्हां घरांत नेहमी राहण्याचा प्रसंग स्रियांसच असतो. हा क्रम आतांचा नाहीं, पूर्वीपासूनच आहे. ह्मणून शिशुसंगोपनाचे काम विशेषेकरून आयांनी माहीत करून घेतलें पाहिजे, म्हणजे प्रसंगीं त्यांची धांदल उडावयाची नाहीं. मुलांस बारीकसारीक दुखणीं नेहमी येतात. त्यांस सामान्य उपचार करावयाचें काम स्रियांस माहीत असावें. प्रत्येक वेळीं वैद्याकडे किंवा डाक्तराकडे धांवणे चांगलें नाहीं.