पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


5' ο आईबापांचा मित्र. कारक परिणाम घडतात. पुढील उतारा पाहा:-“लग्नापूर्वी जी मुलगी केवळ निश्चित रीतीनें वागत असते, तीच मुलगी लग्न झाल्यावर प्रथम नव-याचे व मग संततीचे सेवेंत तत्पर राहूं लागते; तिला त्यांच्याशिवाय कांहीं सुचत नाहीं; अशीं कितीतरी उदाहरणें दृष्टीस पडतात. तसेंच जो माणूस लग्नापूर्वी कदाचित तिरसट स्वभावाचा व दयामायाहीन असतो, तोच माणूस लग्न होऊन मुलेंबाळे झाल्यावर बायकोसाठीं पाहिजे ती झीज सोसण्यास तयार होतो; व मुलाबाळांचें काडीभर कमी पडू नये ह्मणून नेहमी काळजी वाहात असतो; शिवाय सर्वप्रकारी पूर्वीपेक्षां अधिक आत्मसंयमन करूं लागतो. विनाकारण चैन करणें, किंवा चैनीत फाजील पैसा खर्च करणे, शरीरास फाजील त्रास देणें, बाहेरून घरीं वेळेवर परत न येणें, जिवाबद्दल बेफिकीर राहाणे, या गोष्टी कमी होतात; अशीं उदाहरणें थोडीं थोडर्की दृष्टीस पडतात, असें नाहीं.’ आत्मनीतीचीं तत्र्वे-पृष्ठ. १५७॥१५८ ५ संतति झाल्यावर आईबापांच्या मनांत प्रेम उत्पन्न होतें, व तीं प्रेमानें वागतात, व मुलांच्या कल्याणाच्या गोष्टी करतात, यांत शंका नाहीं; पण त्यांनी संतति होण्यापूर्वी पुढल्या अडचणी मनांत आणून, त्यांच्या तरतुदीबद्दल विचार व तयारी करून ठेवणें अधिक चांगलें. कारण संसार सर्व करितात; कसा तरी तो तडीला जातो; पण तो जेवढ्या गुण्यागोविंदानें तडीस जावा, तेवढ्या गुण्यागोविंदानें फार थोड्यांचा जातो. याचे कारण पुढील स्थितीचा विचार आधी केलेला नसतो. याकरितां पुढील स्थितीचा विचार होतां होई तों आधीं करणें चांगलें. ६ संसार हा दुर्भर आहे, असें संस्कृत कवींनीं वारंवार ह्यटलें आहे, तें खोटें नाहीं. संसारांत मनुष्यांस नेहमी उणेपणाच वाटत असतो, तो कधीं भरून येत नाहीं. पण असलेल्या गोष्टींत तृप्ति मानीत गेल्यास व ह्या गोष्टींपासून होणाच्या सुखावा **** घेतल्यास, तें कांहीं थोडें नसतें, असाही अनुभव येईल. ७ मनुष्य प्रथम विवाहाची इच्छा करतो. विवाद ******