पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/3

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


प्रस्तावना. مـــــــــــــــــــــــه جـــــــــــــــــــــــ १ मित्राचे काम चांगल्या गोष्टी सांगण्याचे, हिताच्या गोष्टी सांगण्याचे, हें ह्मणजे कोणास ठाऊक नाहीं, असें नाहीं. ‘पापान्निवारयति योजयते हिताय,’ हें सुभाषित पुष्कळांच्या कानांवरून गेलें असेल. आईबापांस चार हिताच्या गोष्टी सांगाव्या, असें वाटल्यावरून हा लहानसा लेख लिहिला आहे. तो पूर्ण आहे असें समजावयाचे नाहीं; त्यांत उत्तरोत्तर भर पडावयाची आहे. परंतु अशा संग्रहाचा आरंभ करून ठेवावा, असें वाटल्यावरून हा अल्प प्रयत्न केला आहे. ‘हितं मनोहारि च दुर्लभं वचः’ हें वाक्य सर्वास माहीत आहे. हिताची असून मनोरम गोष्ट सांगणें कठीण आहे. तेव्हां मित्रत्वाच्या नात्यानें चार गोष्टी सांगतांना, कोठे अधिकउणें झाल्यास, त्याबद्दल मातापितरांनीं रागावू नये. २ हल्लीं आमची स्थिति फार चमत्कारिक झाली आहे. आमचे हित कशांत आहे, हें आह्मांस समजेनासें झालें आहे. प्रलेक विषयावर अनेकांचीं अनेक मतें कानांवर येऊं लागल्यामुळे, आह्मी गोंधळून गेलों आहों; त्यांतून सार काढण्याचे आमचे प्रयत्न, अद्याप चांगलेसे तडीस गेले नाहीत. कोणतेंही काम, आह्मांस स्वतांच्या प्रयत्नानें तडीस १ सर्व सुभाषित असें आहे: पापान्निवारयति योजयते हिताय गुह्यानि गृहति गुणान्प्रकटीकरोति । अापद्गतं च न जहाति ददाति काले सनिमन्त्रलक्षणमिदं प्रवदन्ति सन्तः ॥ याचे भाषान्तर वामनपंडितांनीं असें केलें आहे: योजी हिताप्रति निवारुनि पापकर्म वर्णों बरेच गुण झांकुनियां कुकमें ॥ दे आपणांस असतां, व्यसनीं त्यजीना सन्मित्रलक्षण असे वदतात जाणा ॥