पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

スー आईबापांचा मित्र. निश्चय केल्यावर, कितीही विन्ने आलीं तरी तीं सोसण्याची शक्ति येईल, व तीच संवय वाढत गेल्यावर तोच खभाव बनून जाईल. दुसच्यास दुःख द्यावयाचे नाहीं, असा दृढ निश्चय झाल्यावर नैतिक वासना प्रवळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. १० शारीरशक्ति पुरुषांची तेवढी सुधारली ह्मणजे झालें, असें ह्मणून चालावयाचें नाहीं; ती स्रियांचीही सुधारली पाहिजे. त्यांसही योग्य तो व्यायाम घेण्यास अडचण नसावी. शेतक-याचे शेतांत लावण्याच्या बिंयास मात्र जपून चालत नाहीं, त्यास शेताचीही मशागत करावी लागते. वेळच्या वेळीं बांध दुरुस्त करणें, जमीन चांगली फोडून साफ करणें, शेतांत खत घालणें, जमीन भाजून तयार करणें, वगैरे क्रिया न केल्यास त्याचे शेत व्हावें तसें फलदूप होणार नाहीं; याप्रमाणेच ज्या शक्ति पुरुषांस हितकारक आहेत, त्या सर्व स्रियांसही हितकारक आहेत; व उभयतांच्या सर्व शक्तींचा फायदा संततीस मिळावयाचा आहे: याकरितां ह्या पुस्तकांतील सर्व गोष्टी आईबापांस उद्देशून लिहिल्या आहेत; तरी स्रियांबद्दल वेगळे दिग्दर्शनही कोठे कोठे करणें इष्ट आहे. कारण आमच्या समाजांत उभयतांच्या ह्मणजे स्रीवर्ग आणि पुरुषवर्ग यांच्या आचरणांत बराच फरक असतो. ११ कित्येक ठिकाणीं घरांतील कामानें स्रियांचा चुराडा उडत असतो, तर कित्येक ठिकाणीं त्यांस कांहीं कामच नसतें. या दोन्ही गोष्टी सारख्याच अहितकारक आहेत. घरांतील काम बायकांनीं करावयाचें, पण तें जर त्यांस झेंपत नसलें तर पैसा खर्च करून किंवा अन्य रीतीनें त्यांस मदत केली पाहिजे. तशी तजवीज लागण्यासारखी नसल्यास-एका हातांत फार ओझें झाल्यास त्याचा *ार आपण जसा दुस-या हातावर टाकतों, त्याप्रमाणे-पुरुषानें *ामुख्या अधोगीस श्रमविभागाच्या तत्वाप्रमाणे साह्य केलें पाहिजे; खाशिवाय गत्यंतर नाहीं. ज्या ठिकाणीं स्त्रियांस घरांतलें काम ****ागत नाही, त्या ठिकाणीं ह्यांस नुसत्या गौरींप्रमाणें बस* *ई नयेत. त्यांस तोच वेळ कळाकुसरीचीं कामें करण्यांत,