पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


१२. आईबापांचा मित्र. त्यांनीं या गोष्टी लक्षांत ठेवाव्या व समाजांतील श्रमविमुखता दूर व्हावी ह्मणून प्रयत्न करावा. वरिष्ठ वर्गाची वागणूक पाहून कनिष्ठ वगै वागत असतात. वरिष्ठ वर्गात श्रमविमुखता पसरली, म्हणजे श्रमविमुखता हेंच सुख अशी भावना कनिष्ठ वर्गाचीही होऊं लागते, व यामुळे जो तो श्रमविमुख बनूं लागतो. याचा प्रत्यय पदोपदीं लोकांस हल्लीं येऊं लागला आहे. आपलें काम नेटानें करणारी माणसें हल्लीं कमी आढळतात. कामावर मजूर घेतल्यास तो चुकवाचुकव करतांना दृष्टीस पडतो. आपल्या कामाला वाहिलेले लोक फार कमी दिसतात. पावसाळा जवळ आला म्हणजे शेतांत जाणारे, व कशीबशी शेताची लागवड करणारे शेतकरी पुष्कळ आढळतात. जमिनीची मशागत चांगली करून, थोडीच जमीन पण ती व्यवस्थित लावणारे शेतकरी, कमी होत चालले आहेत. कोणताह धंदा विशेष लक्ष लावून व विशेष परिश्रम करून केल्याशिवाय, फलद्रूप होणे शक्य नाही. याकरितां आईबापांनी आपल्यांतली श्रमविमुखता दूर सारण्याचा प्रयत्न करावा. ५ शरीरसंपत्तीची काळजी घ्यावी. १ निर्वाहाचा उद्योग कोणताही असो. तो करतांना आपली प्रकृति नीट राखण्याचा व साधेल तर ती अधिक सुदृढ करण्याचा प्रयत्न करावा. सर्व पराक्रमाचे मूळ व आत्म्याचें घर शरीर. तें निरोगी असेल तर मन निरोगी राहील. दोन्ही निरोगी असतील व्हां मनुष्यापासून पराक्रमाचीं कामें होतील. मनास उल्हास वाटल्याशिवाय कोणतेंही काम नेटानें करतां यावयाचे नाहीं. निरोगीपणाशिवाय उत्साह राहणे शक्य नाहीं. प्रपंचांत येणाच्या अनेकविध अडचणींशीं टक्कर मारण्यास, उत्साहशक्ति जबर असल्याशिवाय चालावयाचें नाहीं. २ शेतकरी आपल्या शेतांत पेरण्याच्या बिंयाविषयीं जशी काळजी घेतो, तशी आपण आपल्या शक्तीच्या जोपासनेकरितां काळजी घेतली पाहिजे. शक्ति कायम रहावी व वाढावी, म्हणून आप