पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग पहिला. ११ २ अद्याप आमच्यांत सुशिक्षित लोक फारसे नाहीत. तरी सरकारी नोकर साधारणपणें सुशिक्षित असतात, पण त्यांचे वर्तन अद्याप चमत्कारिकच आढळतें. कसें तें पहा:-जो तो सरकारी नोकरीत चूर ! त्यांचे साहेब, ते व त्यांचे खातें, या बाहेर जग आहे, ही कल्पनाच त्यांच्या मनास शिवत नाहींसे दिसतें ! दहा वाजतां कचेरीत जावें, संध्याकाळीं कचेरींतून सुटल्यावर चार पावलें फिरावयास जावें, व मग बि-हाडीं यावें. रात्रीं कामाचे पुडकें बरोबर आणिलें असल्यास खरडेघाशी करावी, नाहींतर काम नसल्यास खस्थ घोरत पडावें. चार मंडळी जमल्यास घशी, कोट, करण्यांत किंवा म्यारेज, रायल म्यारेज, उडवण्यांत वेळ घालवावा. आमची सगळी सुधारणा, आमचे सगळे खातंत्र्य या असल्या वागणुकींत एकत्र झालें आहे ! आमच्या वागणुकींत काय चूक होत आहे, त्याचा संततीवर काय परिणाम होत आहे, इकडे आमचे लक्ष जात नाहीं. सरकारी नोकरी इमानें इतबारें करणें हें प्रत्येकाचें कर्तव्यच आहे. पण श्रमविमुख बनणे किंवा वेळाचा अपव्यय करणे चांगलें नाहीं. यापासून भलतेंच वळण संततीस लागण्याचा संभव असतो, तोच वेळ कांहीं ज्ञान संपादनाच्या कामांत किंवा परोपकारांत दवडण्याची संवय लागल्यास हितावह होईल. ३ कितीही चांगले सरकारी नोकर झाले, त्यांनी आपलीं कामें इमानं इतबारं कॅली, सरकाराकडून किताब मिळविले, संततीकरितां द्रव्याच्या राशी गोळा केल्या, तरी तेवढयानें त्यांस ‘चांगले आईचाप’ असें ह्मणतां येणार नाहीं. त्यांनी आपल्या संततीच्या जोपासनेकरितां योग्य ते परिश्रम केल्याशिवाय त्यांस तो किताब मिळणार नाहt. वाच्याबरोबर उडून जाणारी, सांठविलेल्या द्रव्याचा योग्य व्यय न करणारी, किंवा पोषणाकरितां दुसच्यावर अवलंबून राहणारी, कशीतरी संतति आपल्यामार्गे ठेवण्यांत पुरुषार्थ नाहीं. ४ जी गोष्ट सरकारी नोकरांविषयीं सांगितली, तीच इतर लोकांसही लागू आहे. आपल्या संततीचे, समाजाचे व देशाचे, कल्याण व्हावें, असें ज्या आईबापांच्या मनास वाटत असेल,