पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ३ मुलांचे कल्याण व्हावें, अशी ज्या आईबापांची इच्छा असेल, लयांनीं प्रथम आपण चांगल्या कित्त्याप्रमाणे होण्याचा साधेल तेवढा प्रयत्न करावा, म्हणजे आपलें वर्तन चांगलें ठेवण्याचा प्रयत्न करावा. ६ आईबाप होण्यापूर्वी कदाचित् त्यांच्यांत एखादा दुर्गुण असला, त्यांस एखादी वाईट संवय असली, तरी आपल्या संततीस तो दुर्गुण लागूं नये किंवा ती संवय बाधू नये, म्हणून तो दुर्गुण व ती वाईट संवय संतति झाल्यावर, त्यांनीं सोडून दिली पाहिजे. नाहींतर त्यांच्या संततीस बहुतकरून वाईट वळण लागेल. संततीवरून लोक त्यांची परीक्षा करतील, व त्याचा परिणाम त्यांस व लयांच्या संततीस सारखाच बाधक होईल ! ७ ‘बापसे बेटा सवाई’ अशी संतति होण्याचे एकीकडे राहून, दिवसेंदिवस हरभ-याच्या झाडावर चढण्यास शिडी लावावी लागण्यासारखी,-किंवा मोठ्याशा वा-यानें सहज उडून जाणारीसंतति कोठे कोठे दृष्टीस पडते, याचे तरी कारण हेंच आहे. संततीस आईबापांचे वर्तन कित्त्यासारखें उपयोगीं पडतें, त्याप्रमाणेच संततीस आईब॥पाची शरीर संपत्ति घरच्या भांडवलासारखी उपयोगीं पडते. घरचे भांडवल असलें म्ह्णजे व्याप,रांत पुष्कळ नफा होतो, व्याज देण्याचा तगादा मागें नसतो, केवळ दराच्या चढउतारानें दिवाळे वाजण्याचा प्रसंग येत नाहीं; त्याप्रमाणेच वडिलार्जित शरीरसंपत्ति चांगली असल्यास सततीस ती आपल्या प्रयत्नानें वाढवितां येते, किंवा कायम ठेवून पुढील संततीस भाडवलादाखल देतां येते, व आपल्या आयुष्यात असलेल्या सुखाचा अनुभव घेतां येतो. परंतु वडिलापासून तिचा लाभ घडला नसल्यास, ह्या वर सांगितलेल्या गोष्टी नीट करतां येत नाहीत. प्लेगसारख्या सांथीच्या रोगाशीं किंवा परिस्थितीशीं झगडतांना टिकाव लागण्याचे कठीण पडतें, व केव्हां केव्हां दुस-याचे भांडवल अणून व्यापार करणाच्या व्यापाच्याप्रमाणे संततीचे दिवाळे निघण्याचाही प्रसंग येतो ! अशक्त व दुर्बळ आईबापांची संतति सशक्त व सबळ कशी