पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/106

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


९४ आईबापांचा मित्र. उपसंह्रार. ->-- १ आईवापांनी आपल्या मुलांकरितां काय केलें पाहिजे, हें सांगण्याचा या लेखाचा मुख्य उद्देश होता. आईवापांचे आपल्या मुलांवर प्रेम असतें, याबद्दल कोणाचाच वाद नाहीं; पण कोणत्याही वस्तूचा चांगला उपयोग केला नाहीं, तर ती वर्तु चांगली असूनही तिचा उपयोग व्हावा तेवढा होत नाहीं. याकरितां त्या प्रेमाचा पद्धतशीर उपयोग करतां आल्यास चांगलें. २ आईवापांची मुलांबद्दल साधारणत: थोडथोडी कुरकुर नेहमीं असते. पण त्यांत विशेष अर्थ असतोच असें नाहीं. आईबापांनीं योग्य वर्तन ठेवल्यास, त्यांतील बरीच कुरकुर नाहींशी होण्यासारखी असते. तें वर्तन कसें ठेवावें, हें सांगण्याचा या पुस्तकांत प्रयत्न केला आहे. ३ पहिल्या भागांत, संतति चांगली होण्याकरितां आपण ह्मणजे आईबापांनीं काय केलें पाहिजे, हें सांगितलें आहे. त्यांत आईबापांनी आपली प्रकृति सुदृढ राखण्याचा प्रयत्न करावा, निव्र्यसनी असावें, आपलें मन शांत ठेवावें, सद्वर्तनी व्हावें, आपलीं सर्व कर्तव्यें नीट ओळखून, ती अमलांत आणण्याकरितां कायावाचामनेंकरून झटावें, ह्मणजे आपलें वर्तन कित्त्यासारखें संततीस उपयोगी पडेल, व संतति सहज चांगली होईल, असें सांगितलें आहे. ४ दुस-या भागांत, आईबापांची मुलांशीं वागणूक कशी असावी, यूवृद्दल विचार केला आहे. यांत आईबापांनी आपलें प्रेम योग्य रीतीन ठेवल्यास, मुलांची सुधारणा कशी होते, हें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यांत आईबापांनी जें प्रेम करावयाचे, तें निष्कामु असावें, त्याच्याबद्दल मोबदला मिळण्याची इच्छा ह्यांनी ** नये. आपलें कर्तव्य ह्मणून तें करावें, असे सांगितले आहे.