पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तांच्या खरूपांत, गुणांत, शीलांत मेळ असेल तितका चांगला, यांत कांहीं शंका नाहीं. केवळ पैशावर नजर देण्याची प्रवृत्ति अधिक दिसते, ती कमी झाली पाहिजे. पैसा हें एक सुखाचे साधन आहे खरें, पण सर्वच गोष्टी पैशानें साध्य होत नाहीत, हें लक्षांत ठेवावें. स्रीपुरुषांचे जोडे विजोड बनवून, दैवावर हवाला ठेवण्याचा प्रकार अगदीं सोडून द्यावा. विवाह हा नवराबायकीच्या सुखाकरितां करावयाचा आहे, हें विशेषेकरून लक्षांत ठेवावें. आपल्या कांहीं सोई व्हाव्या, किंवा आपल्या आवडी पुराव्या, म्हणून तो करावयाचा नाहीं. ह्या साच्या गौण गोष्टी होत. संततीस शिकवून तयार करण्याचे काम आपण करावें, विवाह करण्याचे आपलें कामच आहे, असें समजूं नये; योग्य प्रकारानें विवाह करतां आल्यास करावा, नाहींतर तें काम त्यांचे त्यांस करूं द्यावें. ४१ मुलींचे विवाह करण्याची जबाबदारी धर्मशास्राप्रमाणें आईबापांवर आहे. तरी ते करतांना त्यांनीं दुराग्रह धरूं नये. सावित्रीच्या गोष्टीचे स्मरण ठेवावें. आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा विचार करावा, लहानपणीं विवाह करूं नये. शक्य तितक्या त्यांस मोठ्या कराव्या, युक्तीनें त्यांचे मत काढून घ्यावें, अशक्त किंवा कुरूप वरांना देऊं नयेत. व्यंग मुलाचे तर भरीस पडूंच नये. गरीबी पुरवेल पण न्यूनता पुरवत नाहीं. म्हाताच्या नवच्यास देऊं नये. मुलीचे पैसे घेऊं नयेत. सामथ्यौपेक्षां अधिक पैसा खर्च करून कुटुंबाची नागवणूक करूं नये. योग्य वर आपल्या स्थितीप्रमाणे पाहाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्यांच्या मुली त्यांस दुवा देतील, त्यांचे जन्म सुखांत जातील, व आईबापांसही लयांनी आपलें कर्तव्य योग्यरीतीनें वजावल्यामुळे आनंद होईल.