पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ξο - आईबापांचा मित्र. रांची गांठ पडण्याचा व एकमेकांचे खभाव पाहाण्याचा, प्रसंग त्यांस आणून देतां येईल, तर कांहीं वाईट नाहीं. सर्व गोष्टींवर साधारण लक्ष ठेवून झालेले आमच्यांतील विवाह, केवळ असुखासच कारण होतात, असें आढळत नाही. त्यांतले पुष्कळ विवाह उभयतांच्या सुखास कारण झालेले आढळतात. पुष्कळ जोडप्यांत एकमेकांवर प्रेम करणारी-निरतिशय प्रेम करणारी-नवराबायको दृष्टीस पडतात. तेव्हां विवाह आईबाप करोत,-किंवा मुलें वयांत आल्यावर ती आपले आपण करोत,-सारासार विचार करून ते झाले, ह्मणजे वधूवरांच्या सुखास कारण झाल्याशिवाय राहाणार नाहीत. ३५ लहान वयांत लमें झाल्यास, संतति दुबळी होण्याचा संभव असतो. उतार वयांत संतति झाल्यास, तीही कमजोर होण्याचा संभव असतो. उभयतांची शरीरप्रकृति निरोगी व पूर्णावस्थेत असतांना होणारी संतति, सुदृढ व निकोप होण्याचा संभव पुष्कळ. याकरितां मुलांच्या विवाहाचा काल वीस वर्षापासून तीस वर्षेपर्यंत प्रशस्त ठरतो. ३६ मुलींचा विवाहकाल-ऋतुप्राप्तीची अडचण मानली जात आहे तोंपर्यंत-बारा वर्षाच्या फारसा पुढे नेणें शक्य नाहीं. मुलींस लौकर ऋतुप्राप्त होईल, तर संभोगकाल थोडाबहुत दूर लोटणे शक्य आहे. ऋतु प्राप्त होतांच, सोळा दिवसांच्या अांत गभोंधान करण्याची घाई, अलीकडे फार दृष्टीस पडते, ती करण्याचे विशेष कारण दिसत नाहीं. पुढे गर्भाधान करण्याचें मनांत आणल्यास दिवस पाहावा लागतो, ही कांहीं मोठी अडचण आहे, असें नाहीं. स्रीची वाढ पुरी होण्यास सोळापासून अठरापर्यंत वर्षे लागतात. व तिला संतति वीसर्पचवीस वर्षाच्या दरम्यान सशक्त होते, असें वैद्यशास्र जाणणारांचे मत आहे. याकरितां उपभोगकाल थोडाबहुत लांबवीत गेल्यास, या गोष्टी सहज साधण्यासारख्या आहेत. आईबापांनी आपल्याकडून होणारा शक्य ती उपाय केल्यास, समाजांतील दुबळेपणा बराच कमी होईल.