पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग चवथा. くS मेहेनत करी, पण ती मुलगी अगदीं लहान असल्यामुळे, उगीच हट्ट करीत बसे; रडावयास लागे, व तिची समजूत बहुधा होत नसे. त्या गुजराथ्यास लग्न केल्याबद्दल वारंवार पश्चाताप होई, व केव्हां केव्हां तर तो बायकोचा हट्ट पाहून फार कंटाळून जाई ! तेव्हां वयांत साम्य असण्याची किती आवश्यकता आहे, हें यावरून कळून येईल. ३३ परस्परप्रेमामुळे झालेल्या विवाहापासून पुष्कळ फायदे होतात, हें निर्विवाद आहे. निदान त्या स्थितींत दुसच्यावर दोष ठेवण्यास तरी जागा नसते, पण त्या स्थितींतही तोटे नाहीतच असें नाहीं. दोघांचे प्रेम एकदम गांठ पडून जमल्यास, पुष्कळ वेळां तें बेगडेच्या रंगासारखें प्रथम मात्र झगझगीत दिसतें. पण हळू हळू कमी होऊन शेवटीं अजीबात नाहींसें होतें. शिवाय परस्पर प्रेम कसोटीस लागण्यास, आपली हल्लींची सामाजिक स्थिति फारशी अनुकूळ नाहीं. प्रौढ मुलगे व मुली, यांची गांठ लग्नाच्या आधीं विशेष मोकळेपणीं पडण्याचे प्रसंग, आपल्यांत फारसे येण्याचा संभव नसतो. फार तर मुलगे व मुली एकमेकांजवळ बोलू शकतील, दृष्टीस पडू शकतील, खेळू शकतील, पण त्यांस बराच वेळ एकत्र राहाण्याचे किंवा एकमेकांचीं मनोगतें एकमेकांस कळविण्याचे, किंवा एकमेकांचे खभाव तपासून पाहाण्याचे, प्रसंग फारसे येण्याचा संभव नसतो. ३४ आपल्या हल्लींच्या पद्धतींत, पुष्कळांचा भर टिपणें पाहाण्यावर असतो. तो दूर ठेवला, तरी कुळशीळ व गोत्र पाहिल्याशिवाय चालावयाचेंच नाहीं. ज्यांच्या गोत्राशीं जमत नाहीं, त्यांच्या इतर गोष्टींत कितीही साम्य असलें तरी, त्याचा कांहींएक उपयोग नाही. याकरितां नुसतें प्रेम विवाहास कारणीभूत होणें, आपल्यांत फारसें शक्य नाहीं. ह्मणून केवळ वधूवरांची आवड, ही आमच्यांत लग्नाची मुख्य बाब होऊं शकत नाही. तरीपण वडील माणसांनीं तिच्याकडे दुर्लक्ष करूं नये, केवळ आपलाच हेका चालवू नये, संततीचा अभिप्राय घेत जावा. विवाहापूर्वी वधूव -