पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/100

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


くく आईबापांचा मित्र. पणें बारा वर्षे लागतात. याकरितां विवाहाचा काल साधारणपणें वीस वर्षापासून धरण्यास हरकत नाहीं. ‘विशी विद्या व तिशी धन' ही म्हणही साधारणपणें त्याच कालाचा बोध करिते, बरेच विवाह या सुमारास होतात. तीस वर्षापर्यंतही विवाह झाल्यास फारसें वाईट नाहीं. परंतु पसतीस किंवा चाळीस या वयापर्यंत विवाहाचा काल लांबवीत नेणें, फारसें हितकर होणार नाहीं. - ३१ विवाह करावयाचा तो आपल्यास संसार चालवण्यास एक चांगला जोडीदार असावा,म्हणून करावयाचा; तो जोडीदार जितका समेजस, सशक्त, सङ्घणी, सहनशील, व समवयस्क असेल तितका चांगला; मुलें खेळू लागल्यास त्यांचे लयांच्या समवयस्कांशीं जसें जमतें, तसें त्यांच्यापेक्षां लहान किंवा मोठ्या मुलांशीं जमत नाहीं. वधूवरांचेही असेंच आहे. प्रथम विवाहांत वधूवरांचे जसें जमतें, तसें द्वितीय विवाहांत जमत नाहीं. याचे कारण त्यांच्या वयांतील असमता. द्वितीय विवाहांत वर पोक्त असतो, तशी वधू पोक्त मिळण्याचा संभव नसतो. वयोमानांत फरक असल्यामुळे त्यांच्या खभावांत, समजुतींत, वागणुकींत, आवडीनिवडींतही फरक असतो, यामुळे एकमेकांचे एकमेकांशीं जमणें कठीण पडतें. वधू लहान, तिचे मन निष्कपट व सरळ, पण पति वृद्ध, अनुभविक व संशयी, मग अशा वधूवरांचे पटावें कसें ? प्रथम विवाहांत सुद्धां, उभयतांच्या वयांत बरेंच अंतर असल्यास, ही अडचण जाणवल्याशिवाय राहाणार नाहीं. ३२ मुलगी कितीही वाढली, तरी हल्लींच्या स्थितीत ती बारा तेरा वर्षाची होणार, तेव्हां तिचा विवाह वीसपंचवीस वर्षांच्या पुरुषाशी झाल्यास, तो जितका योग्य व उभयतांत मेळ ठेवणारा होईल, तेवढा पुरुषाचे वय बरेंच वाढलेलें असल्यास त्याच्याशी मेळ ठेवणारा होणार नाहीं. एक गुजराथी तीस वर्षांचा होता व ह्याची बायको आठ वर्षीची होती. घरांत दोघांखेरीज तिसरै मनुष्य नव्हतें. नवरा तिचे मन राखण्याकरितां हवी तवडी