पान:Aagarakar.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

૧૮

पोरीचें लोढणें बांधणें म्हणजे त्याची सर्व प्रकारची पुढील गति खुंटविणें होय, हॅ यांस पक्कें समजत असूनहि कर्ज काढून अल्पवयस्क पोरी विकतील, व मनासारखी किंमत आल्यास आपले पोरगे विकत देतील ! स्वत: च्या घेऱ्याचा किंवा मिशीचा एक केंस फाजील कापला गेला तर ते नित्याच्या न्हाव्यावर वाघासारखें चवताळून जावयास सोडावयाचे नाहींस, व माता- पितरांपैकी एखाद्याचा अंत होऊन आपल्या मुखभूषणावर स्वल्पकालीन गदा आली, तर ज्यांस मरणप्राय दुःख झाल्याशिवाय रहावयाचें नाहीं, अशा लोकांना, घरीं आलेल्या सुनेस किंवा मुलीस, जवळचें पर्व साधून जबरीने न्हाव्याच्या ताब्यांत देण्यास काडीएवढे देखील वाईट वाटावयाचें नाहीं ! चोरटेपणानें हे पाहिजे तसली कुकर्मे करतील. एकांतांत किंवा ठरीव कंपूत इंग्रजी भाषेतील ब्रँडी या शब्दांतून निघणाऱ्या ॐयंत त्रयीपैकी कोण- ती वस्तू यांना कदाचित् वर्ज्य असणार नाहीं; पण समाजांत हे अपेय- पानाचा, अगम्यगमनाचा व अभक्ष्यभक्षणाचा इतका तिटकारा दाखवतील की, तो पाहून एखाद्या भोळसटास हे शुद्धत्वाचे खंदक आहेत की काय, असा भास होईल ! ताप्तर्य, बहुजनसमाजाकडून 'शाबास म्हणवून घेण्या- साठीं व आपल्या मिळकतीस धक्का पोचू न देण्यासाठी दंभ, निष्ठुरता व अविचार यांचा हे किती अवलंब करतील, हें सांगतां येणें अशक्य आहे ! असल्या लोकांनी सुधारकांस ' तुम्ही करून कां दाखवीत नाहीं, निराळी जात कां स्थापीत नाहीं, उदाहरण का घालून देत नाहीं, ' असे प्रश्न कर- ण्यांत विशेष पुढारीपण घेऊन, आपण पूर्वाचाराचे भजक, तारक व प्रव- र्तक आहों, अशी सामान्य लोकांस भुरळ पाडून त्यांस प्रतिदिवशी चकवावें आणि स्वार्थसिद्धीसाठी त्यांना हवेंतसें बुचाडून, सन्मार्गाकडे त्यांच्या अंत:- करणाची प्रवृत्ति सहसा होऊं देऊं नये, हें अत्यंत स्वाभाविक आहे !
 या तीन प्रकारच्या सुधारणानिंदकांस आम्हीही करून कां दाखवीत नाहीं ? ' हाच प्रश्न घालतो. बालविवाह आणि केशवपन यांचा निषेध करण्यासाठी कायद्याचें साहाय्य घेणें अप्रयोजक होय, असें यांचें म्हणणें आहे. सामाजिक गोष्टीत सरकारने हात घालणें हें अपायकारक आहे, अशी यांची खातरी झाली असेल तर वेश्यागमन, मदिरापान वगैरे व्यसनें बंद करण्यास किंवा कमी करण्यास यांनी सरकारास कां आळवावें, हें समजत