पान:Aagarakar.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून कां दाखवीत नाहीं ?

असूनही लोकलज्जेमुळे अंध होऊन पूर्वापार चालत आलेल्या रूढीचें व विचाराचं लोण पुढल्या पिढीपर्यंत पोचवीत असतात एकीकडे तुम्ही यांच्याश बाद करीत बसला असलां, तर कदाचित् ते असें कबूल करतील कीं, तुमचें म्हणणे बरोबर आहे व तदनुसार लोकांचें वर्तन होऊं लागल्यास, त्यांत त्यांचे कल्याण होण्याचा संभव आहे; पण असले काम करण्यास आम्ही प्रवृत्त होणार नाहीं व असल्या गोष्टींचा उघडपणे स्वीकार करण्याचें धैर्य आमच्या अंगीं नाहीं, असें ते तुम्हांस साफ सांगतील. असले लोक बहुश: दुसऱ्यांच्या आचाराविषय व विचारांविषयीं उदासीन असतात; पण आणी - बाणीचा प्रसंग आल्यास हे आपल्या विचारशक्तीस गुंडाळून ठेवून, पहिल्या प्रकारच्या अज्ञान, अविचारी व आग्रही लोकांचें अनुगमन करतात !! या दोहों- शिवाय सुधारणानिंदकांचा आणखी एक प्रकार आहे, तो मात्र अतिशय खड- तर आहे, असें म्हणणें भाग आहे. यांतील लोक पहिल्याप्रमाणें मूढ नसतात व दुसन्याप्रमाणें भेकड नसतात. बरेवाईट यांस कळत असतें व उचित दिसेल तें करण्याचे किंवा बोलण्याचें धैर्य यांचे अंगों असत नाहीं, असें मानतां येत नाहीं. असें असतां सुधारणेस या लोकांकडून जितका अड- थळा होतो, तितका दुसऱ्या कोणाकडूनही होत नाहीं. हा होण्याचें कारण यांची अमर्याद स्वार्थपरायणता. हिला तृप्त करण्यासाठी हे काय करतील आणि काय करणार नाहींत, हें ब्रह्मदेवाला देखील सांगवणार नाहीं ! यांची स्वार्थपरायणता म्हणजे यांचा द्रव्याभिलाषच नव्हे. यांना नुसत्या पैशाचाच इव्यास असता व त्यांच्या अंगीं तेवढाच दुर्गुण असता तर त्यांचें वर्तन जितकें निंद्य होत आहे तितकें कधींच होतें ना. त्यांची स्वार्थपरायणता पराकाष्ठेची व्यापक आहे. कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी जर तीपासून त्यांचे कोणत्याही प्रकारचे यत्किंचित् नुकसान होण्याचा संभव असला तर ते ती हाणून पाडण्यासाठी आकाशपाताळ एक करून सोडण्याचा प्रयत्न करतील ! यांच्या वर्तनाचा बराच भाग लबाडीचा असतो. पूजाअर्चा वगैरे सारे धर्मविचार झूट आहेत, अशी यांची पक्की खातरी झाली असून, हे प्रतिदिवशीं तास दोन तास संध्या ब्रह्मयज्ञांत घालवतील; सर्वांगाला भस्म फांसून घेतील; श्रावणीचे दिवश शेर दोन शेर पंचगव्य पितील व नख- शिखांत शेणमाती चोपडतील ! चौदा वर्षांच्या पोराचे गळ्यांत आठ वर्षीच्या