पान:Aagarakar.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७३

सुधारणा म्हणजे काय ?

असेल कीं, स्वातंत्र्याचा नित्य अनुभव घेणारा मनुष्य स्वहितपरायण असत नाहीं इतकेच नाहीं, तर बराच परोपकारी, निदान परहितचिंतक तरी असतो. आपल्या श्रमाचें सारें फल आपणासच उपभोगावयास सांपडावें, ही मनुष्याच्या अंतःकरणाची पूर्णावस्था नव्हे; त्या फलाची हवी तशी व्यवस्था लावण्याची मोकळीक आपणास असावी, ही त्याची आकांक्षा असते; व ही जसजशी परिपूर्ण होत जाते तसतशी स्वार्थबुद्धी क्षीण होत जाऊन तो पराकाष्ठेचा परहितैषी होत जातो. तात्पर्य काय कीं, बलात्कार, जबरदस्ती, बळजोरी, सक्ति इत्यादि शब्दांनी व्यक्त होत असलेल्या अर्थाच्या व्यवहारांपासून मनुष्याच्या सुखास पूर्णावस्था येण्याचा संभव नसल्यामुळे तसले व्यवहार नाहींसे होत असून त्यांच्या जागी समय 2 संमति, अनुरोध, रुकार, पसंती इत्यादि शब्दांनी व्यक्त होत असलेल्या ' अर्थाच्या व्यवहारांचा प्रचार सर्वत्र पडत आहे. तेव्हां येथून पुढें राजा व प्रजा; कुलेश व कुलावयव; पति आणि पत्नी; मातापितरें व अपत्यें; स्वामी आणि सेवक; गुरु आणि शिष्य; विक्रेता आणि ग्राहक; यांतील व्यवहार आणि संबंध उत्तरोत्तर बलात्काराने न होतां संमतिपूर्वक होत जाणार आहेत.

X X x  मनुष्याचें स्वच्छंदी वर्तन दोन प्रकारांनीं विघातक होण्याचा संभव असतो; ' एक दुसऱ्याला आणि दुसरें त्याचें त्याला. जर कोणत्याहि व्यक्तीची वागणूक । त्याची त्याला किंवा दुसन्याला अपायकारक होण्याचा संभव नसेल तर त्याला ती हवी तशी करूं देण्यास प्रत्यवाय कशासाठी करावा हे समजत नाहीं. आतां येवढें खरें आहे कीं, हें वर्तनतत्त्व अशा भावार्थाने किंवा विविक्तत्वाने सांगितलें असतां तें कळण्यास सुलभ व आचरण्यास सुकर असें वाटतें. पण नित्य व्यवहारास तें लावूं लागलें असतां फार अडचणी येतात. कारण ज्याप्रमाणे प्राण्यांच्या शरीरांतील अवयव निराळे आहेत व त्यांना पृथक् कामे करावी लागतात, तरी त्या सर्वांना एकमेकांवर कमी अधिक अवलंबून असावें लागून एकमेकास सहायभूत व्हावें लागतें, त्याप्रमाणें समाजाचे अवयवही जरी निराळे आहेत, आणि ते पृथक् कामें करीत अस- तात, तरी त्यांचें एकमेकांवर अवलंबून असून त्यांना एकमेकास सहायभूत