पान:Aagarakar.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६७

सामाजिक घडामोड

आणखी एकदोन गोष्टी सांगतों. समाजांतील लोकांचे नियामक आणि नियत किंवा शास्ते आणि शासित असे मुख्य दोन भाग असतात, हें मागें सांगि‍ तच आहे. तर त्या या भागांपैकी नियामक भाग समाजाच्या परिणती - बरोबर विस्तृत होत गेला तर त्या मानानें नियत भाग क्षीण होत गेला पाहिजे हैं उघड आहे. (ज्या देशांत सरकारी अधिकाऱ्यांची संख्या आणि सरकारने चालविलेलीं खातीं वाढत जातात त्या देशांतील प्रजा अधिकाधिक दुर्बल व परतंत्र होत जाते. सरकारी अधिकारी कोणत्याही खात्यांतले असले तरी त्या सर्वांचा चरितार्थ प्रजेनें दिलेल्या करांवर होत असतो. त्यामुळें होईल तितकी जमाबंदी वाढविणें आणि सक्तीचा अंमल चालविणें वगैरे गोष्टीत त्या सर्वाचे विचार सामान्यपणे एकसारखे असतात. खात्याखात्याचा केवढाही विरोध असला तरी प्रजेशी तंटा करण्याचा जेव्हां प्रसंग येतो तेव्हां र्ती पटदिशीं एक होतात, आणि प्रजेश उद्भवलेल्या तंख्यांत यशस्वी होणें हें सर्वोच हितकारक आहे, असें तेव्हांच लक्षांत आणून एकमेकांस साहाय्य करतात. शिवाय निरनिराळीं खातीं परस्परांस कितीही विरुद्ध असली तरी प्रत्येक खात्यांत खालच्या अधिकाऱ्यांचे वरच्या अधिकान्यांशीं व प्रमुख सरकारशी जे संबंध असतात ते सारे एकसारखेच असतात, व त्या सर- कारचा आणि त्याबरोबर आपला अंमल उत्कृष्ट रीतीनें चालावा, असेंहि प्रत्येकास वाटत असतें; यामुळे साऱ्या प्रकारच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या स्वभावांत एक प्रकारचें साम्य तेव्हांच उत्पन्न होतें, आणि 'समानशीले- व्यसनेषु सख्यं ' या न्यायानें प्रजेच्या कल्याणाकडे विशेष लक्ष न देतां, आपल्या वर्गाचें हित साधण्याविषयीं ते पराकाष्ठेचे तत्पर होऊन, त्या कामीं ते एकमेकांस अंतःकरणपूर्वक मदत करतात. ज्यानें सरकारी नोकरी धरली तो पूर्वीचा कितीही सज्जन असला तरी त्याच्या वृत्तींत जो एकदम एक प्रकारचा पालट होतो त्याचें हें गुह्य आहे. स्वसंरक्षणपरायणता व स्वहित- साधनरति यांनी प्रत्येकास घेरलें आहे आणि तसे होणें स्वाभाविक आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांचा चरितार्थ व चैन प्रजेच्या श्रमाच्या फळावर अवलंबून असल्यामुळे, त्याचा होईल तितका अपहार करण्याकडे त्यांची प्रवृत्ति किती होत जाते, हें कधीं कधीं त्यांच्या ध्यानांतसुद्धां येत नाहीं !
 अधिकारी आणि प्रजा यांत उत्पन्न होणाऱ्या दास केवळ अधिकारीच