पान:Aagarakar.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक घडामोड

एका घराचे दगड काढून दुसऱ्या घराला लावायचे असले तर किती? त्रास पडतो हें सर्वोस माहित आहेच. पण हेच दगड चुन्यांत पक्के बस - विलेले असले तर फारच त्रास पडतो, आणि त्यांतहि पहिली इमारत बांधल्या-- पासून बरीच वर्षे लोटलीं असली, व चुन्याचा आणि दगडांचा एकजीव होऊन गेला असला, तर एकेक दगड सोडविण्यास किती मारामार पडते,, हें कोणास सांगावयास पाहिजे, असें नाहीं. तात्पर्य, कोणत्याही जड द्रव्यांचा संनिकट संयोग करून त्यांपासून एक पिंड केला असतां तो पिंड मोडून त्याच्या घटकांचा निराळा पिंड बनविणें हें अतिशय कष्टाचें काम आहे, प्रत्येक कबूल केले पाहिजे.
 सामाजिक घडामोडींचाही असाच प्रकार आहे. प्रथम व्यक्तीच्या शरीर- रचनेचा विचार करा. आरंभी हैं शरीर समजातीय द्रव्यांचे झाले असून, पुढें तें जसजसे वाढत जाते तसतसे त्यांत विषमजातित्व उत्पन्न होते व ज्या मानानें त्यांत विषमजातित्व उत्पन्न होतें त्या मानानें त्यांत अधिकाधिक उत्पन्न होऊन बाह्य संस्कारांस तें अधिकाधिक प्रतिबंध करूं लागतें. कोवळे वेळू, लहान झाडांच्या खांद्या, किंवा तरुण मुलांचे अवयव यांत किती लवचिकपणा असतो बरें ? वाढ खुंटून प्रत्येक अवयवांत काठिण्य आल्यावर, कोणत्याही मनुष्यास चांगली कसरत शिकतां येत नाहीं, ही प्रत्येकाच्या पाहण्यांतली गोष्ट आहे. सामाजिक शरीरांतही परिणतीमुळे अशाच तऱ्हेचें काठिण्य' उद्भूत होतें. कोणताही समाज एकदां वाढीस लागला, आणि श्रमविभागामुळे त्यास भिन्नावयवित्व प्राप्त झाले, व त्यांत निरनिराळे वर्ग उत्पन्न होऊन ते निरनिराळ्या क्रिया करूं लागले म्हणजे त्यांचें रूपांतर करूं पाहणाऱ्या गोष्टींस त्यांकडून मोठा प्रतिबंध होऊं लागतो. राज्य, धर्म, सैन्य, लोकाचार यांसंबंधानें ज्या रीति एकदां रूढ होऊन जातात त्यांत फिरून बदल करणें अत्यंत दुरापास्त होऊं लागतें. पूर्वापार चालत आलेल्या चालींत विचारदृष्ट्या कितीहि विसंगतता दिसली तरी त्या