पान:Aagarakar.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६३

भारतीय कलांचें पुराणत्व

शकेल ( हिंदुस्थानास मुसलमानांचा वारा सातव्या शतकापर्यंत मुळींच लागला नाहीं. रामायण व भारत यांतील राजे ख्रिस्ती शकाच्या पूर्वीच पांचशे आणि त्यानंतरच पांचशे वर्षे यांच्या दरम्यान होऊन गेले असावे, असें हिंदु लोकांच्या सुधारणेविषयीं ज्यांचें म्हणण्यासारखें अनुकूल मत नाहीं, असें पंडित देखील कबूल करतात.) तर्सेच रामायणांत धंद्यांची जी यादी दिली आहे तीच कोणी झाला तरी आज करील. फार तर काय पण एखादा सेसन्स, रिपोर्ट घेतला आणि त्यांतील वर्गीकरणाकडे पाहिले, तर धंद्यांच्या कोष्टकांत म्हणण्यासारखा फरक करावा लागणार नाहीं. तेव्हां काय सिद्ध झालें कीं, रामायणकालीं या भरतभूमीत जे धंदे येथें चालत होते तेच अद्यापिद्दी चालत आहेत व ग्रीक लोकांच्या आणि मुसलमान लोकांच्या स्वायांनीं त्यांत म्हणण्या- सारखा फरक झालेला नाहीं. आणि वास्तविक पाहिले तर हा फरक त्या लोकांकडून होण्याचा संभवही नव्हता. ग्रीक लोक तर येथे एखाद्या साथी- सारखे, वावटळीसारखे किंवा टोळधाडीसारखे आले आणि गेले ! हिंदुस्थानांत त्यांनी कायमचें ठाणें कर्धीहि दिलें नाहीं, व त्यामुळे त्यांच्याकडून येथील कलाकौशल्यांत म्हणण्यासारखा फेरफार झाला नाहीं. ' म्हणण्यासारखा ' असें बुद्धया लिहिण्याचें कारण असें कीं, ग्रीक लोकांनी आम्हांस जिंकून आपली सत्ता येथे कायम केली असें जरी उपलब्ध इतिहासावरून म्हणतां येणार नाहीं, तरी त्यांचें आमचें दळणवळण मुळींच होत नव्हतें असें नाहीं. कांहीं लोकांची जिज्ञासा आणि काहींचा व्यापार यांच्या योगानें या उभय देशांत बरेंच दळणवळण होत असावें, असें मानण्यास हरकत नाहीं. पण या दळणवळणावरून हिंदुस्थानांतील कारागिरी हिंदू लोकांनी ग्रीक लोकांपासून उचलली असावी, असें अनुमान करण्यास पुरेसा पुरावा मिळत नाहीं. उलट हिंदु व ग्रीक या उभयतांनीहि आपापल्या कारागिरीचीं मूलतत्त्वें आपल्याहून जुन्या अगा तिसऱ्याच आर्यशाखेपासून संपादिलीं असावीं, असें मानण्यास बराच आधार आहे. तमेंच हिंदुस्थानांतील कलाकौशल्याचे अनेक पदार्थ ग्रीस देशांत व इतर देशांत जात असून, त्यांची तेथे मोठी तारीफ व अनुकरण होत असे, याबद्दलहि बराच पुरावा आहे. तेव्हां कारागिरीच्या संबंधानें जर ग्रीक लोकांचें सुद्धां आम्ही कांहीं कर्ज लागत नाहीं, तर त्यांच्या पाठीमागून ज्यांनी या देशांत बऱ्याच शतकांनीं पाय ठेवला त्या मुसल -