पान:Aagarakar.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
ही नैसर्गिक देणगी फार थोड्यांसच प्राप्त झालेली असते, बहुतेक जनता तेल्याच्या घाण्याभोवती डोळे. बांधलेल्या बैलाप्रमाणे श्रेष्ठ लोकांनी घालून दिलेल्या वाटांनी भ्रमण करीत असते; आणि असे तिने करणें हेंच फायदे - 'शीर आहे. ज्यांना स्वतःची अक्कल नाहीं त्यांनीं अक्कलवंतांची कास धरून चालावें हेंच नीट आहे. तात्पर्य, अर्वाचीन विस्तृत यंत्रकला युरोपीअन लोकांप्रमाणें आम्हांस अवगत नाहीं, व ती त्यांपासूनच आम्हीं शिकली पाहिजे, हें जरी आम्ही प्रांजलपर्णे कबूल करतों तरी ती साध्य होण्यास ज्यी हस्तकलाप्राविण्याची आवश्यकता असते, ती हस्तकलाही आम्ही सर्वोशीं युरोपीअन लोकांपासून उचलली पाहिजे हें मत आम्हांस मान्य नाहीं. तथापि आम्ही लोकर जागे झालों नाहीं, तर युरोपीय यंत्रकला आम्हांस साध्य होणार नाही इतकेंच नाहीं तर सुमारें तीन हजार वर्षांच्या परिश्रमानें येथे भव्य उदयास आलेली जी आमची हस्तकला तिचाही लोप होईल, व एकदां तिचा लोप झाला म्हणजे अर्वाचीन यंत्रकलाही आम्हांस संपादितां येणार नाहीं हें कबूल करणें भाग आहे. तेव्हां जे कोणी या देशांत यंत्रकला- प्रसार करण्याविषयीं झटत असतील त्यांनीं लाखों रुपयांची यंत्रे परक्या देशांत खरेदी करून, तीं येथें आणून मांडिलीं आणि त्यांवर माल काढ- ण्यास सुरुवात केली, म्हणजे त्यांच्या श्रमास पूर्ण यश आलें असें आम्हांस वाटत नाहीं. यंत्रांचे कारखाने स्थापर्णे तर जरूर आहेच. पण त्यांबरोबरच त्यांनी दुसऱ्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत त्या ह्या आपली जुनी हस्तकला टाकाऊ नाहीं तर अत्यंत रक्षणीय आहे, अशी लोकांची खातरी केली पाहिजे, व जे त्या कलेत निष्णात आहेत त्यांच्याकडून अर्वाचीन यंत्रकलेचें, ज्ञान संपादवून, तें त्या हस्तकलेच्या विस्तृत उपयुक्तत्वाला कारणीभूत होईल, अशा उपायांची योजना केली पाहिजे. तात्पर्य, ज्या वेळेस आमच्या जुन्या हस्तकलेस नवीन यंत्रकलेचें साहाय्य होऊं लागेल, व पूर्वी जीं चतुरस्रपणाच का नामांकित कारागीर दीर्घ आयासानें, खर्चानें व काळानें थोड्या श्रीमंतांच्या सुखासाठीं व ऐषआरामासाठी करीत तींच कामे यंत्राच्या साहा- य्यानें स्वल्प आयासानें, खर्चानें व काळानें होऊं लागून अनेक गरीबांस जेव्हां त्यांपासून सुख व ऐषआराम प्राप्त होऊं लागेल तेव्हांच आमच्या