पान:Aagarakar.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५७

आमचे दोष आम्हांस कधीं दिसूं लागतील ?


देशांत येऊ दिल्या आणि एकाच्या जुलमाचें जूं निघालें नाहीं तोंच दुस- याच्या जुलमाचें जूं मानेवर घेतलें आणि आपल्या बायकांपोरांसह शतकें- च्या शतकें, हवे तसले हाल सोशीत हीन दास्यावस्थेत काढलीं यांत नवल तें काय ? ग्रीक लोकांना अशा स्थितीत एक वर्ष देखील काढवलें नसतें, मग शतकांची काय कथा ?