पान:Aagarakar.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुधारक काढण्याचा हेतु

 पर्वत, नद्या, सरोवरें, झाडें, पाणी, रानें, समुद्रकिनारे, हवा, खाणी, फुलें व जनावरें ज्यांत स्पष्टपणे दाखविलीं आहेत असा एक, व ज्यांत पारधी व पारधीची हत्यारें, शेतकरी व शेतकीची अवजारें, बाजार व त्यांतील कोटय- वधि कृत्रिम जिन्नस, न्यायसभा व त्यांत येणारे शेंकडों लोक, राजसभा व त्यांत बसणारे-उठणारे सचिव, मंत्री वगैरे प्रमुख पुरुष, भव्य मंदिरें व उत्तुंग देवालये, बागा व शेतें, झोपड्या व गोठे, अनेक पदवीचे व अनेक धंदे करणारे पुरुष व स्त्रिया आणि त्यांची अर्भकेँ, ह्रीं ज्यांत व्यवस्थित रीतीनें काढिलीं आहेत असा एक, मिळून प्रत्येक खंडांतील ठळक देशाचे दोन दोन चित्रपट तयार करवून ते पुढे ठेवले, आणि त्यांकडे निःपक्षपात बुद्धीनें कांहीं वेळ पहात बसलें, तर विचारी पुरुषाच्या मनावर काय परि णाम होतील बरें ? प्रथम सृष्ट पदार्थाच्या चित्रपटांचे अवलोकन केलें तर त्यावरून असे दिसून येईल कीं, विस्तृतता, बहुविधता, मनोरमता, अद्भु- तता, उपयुक्तता व विपुलता यांपैकीं, कोणत्याहि गुणांत या भरतखंडाचा त्रिकोणाकृति पर ग्रीस, इटली, ऐलैंड, युनायटेड स्टेट्स्, ऑस्ट्रेलिया यांपैक पाहिजे त्या रमणीय देशाच्या चित्रपटापाशीं तुलना करण्याच्या हेतूनें मांडला तर असें म्हणावें लागेल की, आमच्या वांट्यास सर्वोत्तम न म्हटला तरी उत्तमांपैकीं एक देश आला आहे. सह्य, विंध्य व कैलास यांसारख्या प्रचंड पर्वतांनीं ज्याची तटबंदी झाली आहे; सिंधु, भागीरथी, नर्मदा, तापी, कृष्णा इत्यादि नदांनी व नद्यांनीं ज्यांतील क्षेत्र सिंचण्याचें व उतारूंचीं व व्यापा- राचीं गलबतें व् आगबोटी वाहण्याचें काम पत्करलें आहे; हिंदीमहासागरानें ज्याला रशना होऊन शेकडों बंदरें करून दिली आहेत; गुजराथ, माळवा, बंगाल, वन्हाड, खानदेश इत्यादि सुपीक प्रांतांनीं ज्यास हवें इतकें अन्नवस्त्र पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे; ज्याच्या उदरांत कोठे ना कोठें तरी हवा तो खनिज पदार्थ पाहिजे तितका सांपडण्यास पंचाईत पडत नाहीं; ज्याच्या रानांत पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या वनस्पति वाढत आहेत, व सर्व

३ आ.