पान:Aagarakar.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ३२

अशक्य होणार आहे.(जाति-विशिष्ट अनतिींत स्त्री व पुरुष या उभयतांकडून सारखा दोष घडत असून आमच्या नीतिकत्यांनीं स्त्रियांचे वर्तनच इतकें दंड्य व दूष्य कां मानले आहे हें समजत नाहीं.)आम्हांस तर असें वाटतें कीं पुरुषांचा स्वार्थ, पुरुषांचा मत्सर व पुरुषांचे अधिक बल हें या पक्षपाताचे, या विषमतेचे, या गईणीय अन्यायाचे कारण होय. या निर्दय मात्सर्यामुळे वन्यपर्यूहून आम्ही क्रूर झालों आहों. ’ १० बालविवाह, स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, स्रीस्वातंत्र्य, सॉवळे-ओंवळे, स्रीपुरुषांचे पेद्देराव, प्रेत-संस्कार, इत्यादि मध्यम वर्गालाच मुख्यतः महत्त्वाच्या वाटणाच्या विषयांवर आगरकरांना बरेंचसें लिखाण करावें लागलें. हा दोष तत्कालीन परिस्थितीचा होता. आगरकरांचा दृष्टिकोन कधींच आपल्या वर्गापुरता संकुचित नव्हता.-समाजाचे सर्व थर व जीवनाचीं सर्व अंगें त्यांना सारखींच प्रिय होतीं. समाजाच्या सर्व थरांचा व त्यांच्या सर्व अंगांचा समतेच्या तत्त्वज्ञानानुसार होणारा विकास हाच त्यांच्या दृष्टीनें सुधारणेचा खराखुरा अर्थ होता. पण परिस्थितीमुळे त्यांच्या लेखनांत मध्यमवर्गाच्या अनेक प्रश्नना अवांस्तव महत्त्व प्राप्त झाले. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची परंपरा चालवण्याचे काम लौकिक दृष्टीनें ज्यांच्याकडे गेले त्या राजकारणांत मवाळ व आर्थिकदृष्टया सुखवस्तु असलेल्या सुधारकांनी आपल्या बंगल्यापलीकडे फार दूरवर सहसा दृष्टि फेंकली नाहीं. अशा स्थितीत आगरकरांच्या विचारांना अत्यंत व्यापक असें अधिष्ठान आहे हें बहुजनसमाजाच्या लक्षांत कसें यावें ? पण आज त्यांचे लिखाण सहज चाळलें तरी समाजाच्या सर्व थरांविषयीं त्यांना सारखाच जिव्हाळा वाटत होता आणि त्यांच्या सर्व अंगांचा सतत विकास व्हावा याविषयीं ते सारखेच दक्ष होते, याचीं इवीं तेवढीं प्रत्यंतरें मिळतील. रेल्वेच्या नोकरांवर होणा-या आर्थिक अन्यायाविषयीं ते कळवळून लिहितात, * रेल्वेची नोकरी म्हणजे शुद्ध गुलामगिरी होऊन बसली आहे ! अगदीं हलक्या स्टेशनावरील स्टेशनमास्तराच्या किंवा तरिमास्तराच्या कर्तव्यतत्परतेवर शैकडें लोकांचे प्राण अवलंबून असतात. असल्या गरीब लोकांच्या शिरावर येवढी जबाबदारी टाकली असून त्यांना पोटभर अन्न मिळू नये,