पान:Aagarakar.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १५४
सारखा उद्योग करण्याची स्वाभाविक व कृत्रिम साधने असतील व सायांस सारखें वैभव प्राप्त करून घेतां घेईल, असें आमचें म्हणणें नाहीं. तथापि एक गोष्ट आम्हांस पक्की ठाऊक आहे कीं, कोणत्याही देशांतील लोकांस प्राप्त होण्यासारखें जें सुख असेल तें त्यांना वर सांगितलेल्या पद्धतीनें उद्योग केल्याशिवाय कधीहि प्राप्त होणार नाहीं. ज्या लोकांस उत्पादक उद्योगाचा कंटाळा, व काही होत असली तर नियामक उद्योगाची असे लोक मोठे- पणास कधीही चढणार नाहींत. पण सध्यां तर आमची तशी स्थिति होऊन गेली आहे. ज्याला त्याला अंमलदार व्हावयाला पाहिजे. सगळ्यांनींच अंमलदार होऊन चैन करण्याची इच्छा धरल्यावर चैनीचे पदार्थ तरी उत्पन्न करणार कोण ? उत्पादक उद्योग करण्याची हौस सार्व- त्रिक होऊन संपत्ति व व्यापार वाढल्याशिवाय सर्वोस चैन तरी कोठून करतां येणार ? अंमलदार मुळींच नकोत असें आमचें म्हणणें नाहीं. पण शेरभर मसाला आणि मूठभर तांदूळ अशी स्थिति काय कामाची ! १७८९ साली फ्रान्स देशात जी मोठी राज्यक्रांति झाली तिच्या अनेक कारणांपैकीं फाजील अंमलदार हैं एक मुख्य कारण होतें. जिकडे तिकडे अंमलदारांचा सुळसुळाट होऊन गेल्यामुळे देशातील वार्षिक संपत्तीचे उत्पन्न अगर्दी संपुष्टात आले होते इतकेंच नाहीं, तर जे थोडे उत्पादक लोक काबाडकष्ट करून थोडी बहुत संपत्ति उत्पन्न करीत, त्यांवर पराकाष्ठेचा जुलूम होऊं लागला होता. अंमलदार वाजवीपेक्षां अधिक झाल्यानें उत्पादक रयतेचे दोन प्रकारांनीं नुकसान होतें. एक, त्यांच्या पगारासाठीं तिला आपल्या प्राप्तीचा बराच वाटा द्यावा लागतो. दुसरें, त्यांच्या जुलमामुळें केलेलें उत्पन्न आपल्या हातीं लागेल किंवा नाहीं, अशा- विषय तिला संशय येऊ लागतो. या दोन कारणांमुळे उत्पन्न करण्याची इच्छा मंदावते, आणि तसें झालें म्हणजे सर्वोचेंच नुकसान होतें. हाच परिणाम सरकारी अंमलदारांशिवाय इतर प्रकारचे अनुत्पादक लोक वाढल्या- नही होतो. फाजील धर्माधिकारी, फाजील नीतिप्रसारक, फाजील शिक्षक, फाजील अडते, फाजील लेखक ( पत्रकर्ते, पुस्तककर्ते, वगैरे ), फाजील वकील, फाजील राजकारस्थानी या सर्वोच्या फाजीलपणांत, म्हणजे त्यांची बाजवीपेक्षां जास्त संख्या होण्यांत, कष्टाळू रयतेचा फार तोटा आहे. अशा