Jump to content

पान:Aagarakar.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५३. विविध विचार

वापरण्याचा प्रघात पडत चालला आहे. व तसें कोणासहि वावगें दिसत नाहीं. अलीकडे व्हाइट मिक्श्चर, शापोटोचा बालकुक्कुटार्क व इतर मांसनिर्मित औषधें गुपचिपपणे घेण्थाचा परिपाठ पडत आहे ! असें असून ब्राह्मण्य जसेंच्या तसें कायम ठेवूं पहाणारांच्या धर्माभिमानास किंवा अविचारास काय म्हणावें, हें आम्हांस समजत नाहीं. कसेंहि झाले तरी थोडया वर्षात अशा प्रकारच्या सोंवळ्याओंवळ्याच्या संबंधानें बराच फेरफार होणार आहे व झाला पाहिजे, यांत शंका नाहीं. पण हा फेरफार बुद्धिपुरःसर प्रयत्न केल्याशिवाय हवा तसा व लौकर होण्याचा संभव नाहीं. × X X

१५. धिक् तुमची विद्या

मनुष्यांच्या उद्योगाचे किंवा प्रवृत्तिप्रणीत मानसिक व शारीरिक चलनावस्थेचे दोन भेद आहेत. एक नियामक व दुसरा उत्पादक उद्योग. नियामक उद्योग म्हणजे ज्वा उद्योगामुळे मनुष्यास आपल्या समाजांत व्यवस्था ठेवतां येते. राजे, मंत्री, लष्करी शिपाई, न्यायाधीश, पोलीस, सामान्य नीतशिक्षक वगैरे लोकांचा उद्योग पहिल्या प्रकारचा आहे; म्हणजे हे समाजयंत्राचे फक्त चालक किंवा व्यवस्थापक आहेत. शेतकरी, कोटी, सुतार, गवंडी वगैरे सर्व प्रकारचे कारागीर व धंदेवाले लोक दुस-या वर्गात येतात, म्हणजे त्यांचा उद्योग उत्पादक आहे. सुधारलेल्या राष्ट्रांतील कांहीं लोक पहिल्या प्रकारचा, काहीं दुस-या प्रकारचा, व कांहीं दोन्ही प्रकारचे उद्योग करीत असतात. देशाच्या विशिष्ट स्थितीप्रमाणे या निरनिराळ्या वर्गातील लोकांचे प्रमाण कमी अधिक होत असतें. केवळ नियामक उद्योग करणारांची संख्या अगदीं स्वल्प असून, थोडासा नियामक व पुष्कळ उत्पादक उद्योग कुरणारांची मोठी संख्या ज्या देशांत असते तो विशेषसुखी असतो. अमेरिकेंत सध्यां अशी स्थिति आहे. त्यामुळे तेथील लोक इतर देशातील लोकांपेक्षां प्रत्येक बाबतींत फार पुढे सरसावले आहेत, अमेरिकन लोकांस उत्पादक उद्योग करण्याचे जणु काय वेड लागून गेलें आहे व त्यामुळे संयुक्त संस्थानें इंद्रलोकतुल्य होऊन गेली आहेत. या संस्थानांच्या खालोखाल इंग्लंड व फ्रान्स हे देश आहेत. सगळ्याच देशांतील लोकांस १० अI.