पान:Aagarakar.pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

* .* * *Ao , y~ ~z " یا تیر ۹ گام حی AMA AMMAASAASAASAASAASAASAASAAMASAM MAMMAAAS A SAS SSAS SSeM AAAA AAAA SAAAAASAeS AAASASAAA AAAeAAAS A SAS SS SAAAAAee MSMS MMMe e Tee SeAAA AAAA AAAA AeSJ A S A S JeS eeSAAAA AASAAAA MMAAA SAAAAA AAAA SAAA AAAAA जखडलेल्या सामान्य मनुष्याच्या बुद्धीला कल्पनाच करतां येत नाहीं. आगरकरांची जिवंतपणीं प्रेतयात्रा निघाली ती याच कारणामुळें. आगरकरांचें विभूतिमत्त्व त्यांच्या हयातींत बहुजन समाजाला जाणवलें नाहीं त्याचेंही कारण हेंच. ३ आगरकरांना अवघे एकुणचाळीस वर्षांचें आयुष्य लाभलें. अलौकिक व्यक्तींना आयुष्य देतांना विधाता कृपण होतो हा जुना अनुभव दुर्दैवानें त्यांच्याही बाबतींत खरा ठरला. पण त्यांचा एकुणचाळीस वर्षांचा तोकडा जीवनपट कितीतरी करुणरम्य आणि धीरोदात्त घटनांनीं नटला आहे. १८५६ साल. कऱ्हाडजवळचे टेंभू गांव. त्या गांवांतल्या गणेशपंत आगरकरांना एक मुलगा होतो. भोवतालीं गोकुळ नसतें; सहारा असतो. पण बारशादिवशीं सरस्वतीबाई आवडीनें आपल्या मुलाचें गोपाळ असें नांव ठेवतात. चिमणा गोपाळ यथाकाल रांगूं लागतो, उभा राहूं लागतो, बोबडे बोल बोलूं लागतो. मुलाच्या या बाललीलांचे आईबाप कौतुक करतात. पण तो थोडासा मोठा होतांच त्यांच्या पोटांत गोळा उभा राहातो. आतां गोपाळाच्या शिक्षणाची काहीं तरी व्यवस्था केली पाहिजे. खेडेगांवांतल्या दरिद्री कुटुंबानें ती कुठें आणि कशी करायची ? छोटा गोपाळ तेथून क-हाडला येतो. तिथे त्याचें आजोळ असतें. आजोळीं त्याची शिक्षणाची सोय होते. कऱ्हाडला या बालजीवाला आपल्या आईची आठवण होत नाहीं असें नाहीं. मधूनमधून स्वप्नांत तो टेंभूला जाऊन आईच्या गळ्याला मिठी मारतो. प्रसंगीं तिच्या कुशींत डोकें खुपसून अश्रुही ढाळतो. पण जागृतींत त्याचें बालमन आपल्या निर्धारापासून क्षणभरसुद्धां विचलित होत नाहीं. दारिद्य आणि दमा यांच्याशिवाय आपल्याला देण्याजोगें आपल्या आईबापापाशीं कांहीं नाहीं हें जणुं कांहीं त्याला कळून चुकलेलें असतें ! क-हाडला गोपाळ जसा पोहण्यांत पटाईत होतो तसा तो लिहिण्यांतही तरबेज होतो. बारा वर्षे पुरीं व्हायच्या आंतच तो निबंध लिहूं लागतो. पण या बुद्धिवान् आणि महत्त्वाकांक्षी मुलाच्या वाटेंत दुर्दैव पुन्हां दत्त