पान:Aagarakar.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४५ विविध विचार

मादक द्रव्यांचें सेवन नित्य करणाऱ्या मनुष्याच्या ज्ञानतंतूंस येणारी क्षीणता त्याची त्याला किंवा त्यासारख्या इतर व्यसनी लोकांना नीट समजली नाहीं, म्हणून ती येत नाहीं, असें म्हणणें ज्याप्रमाणें बरोबर होणार नाहीं, त्याप्रमाणे मूर्खपणाच्या सामाजिक व धार्मिक आचारापासून राष्ट्रस्थितीवर होणारे दुष्प- रिणाम त्या राष्ट्रांतील लोकांच्या लक्षांत आले नाहीत, म्हणून ते होत नाहींत, असें म्हणणेंहि बरोबर होणार नाहीं. जोपर्यंत अशा रीतीनें क्षीण झालेल्या लोकांस त्याहून श्रेष्ठ अशा लोकांशी झगडण्याचा प्रसंग आलेला नसतो, तोपर्यंत त्यांची आयुष्ययात्रा केवळ कष्टमय असते, असें म्हणतां येत नाहीं. पण, जेव्हां त्याचा वरिष्ठाशी प्रसंग येऊन ठेपतो, तेव्हां त्यास आपल्या क्षीण- तेचें भान होऊं लागतें, व एकाएकीं जागृदवस्था त्यास प्राप्त झाल्यासारखें होऊन, आपली अशी दशा कां झाली असावी, असे विचार त्याचे मनांत येऊं लागतात. हा उद्बोध योग्य वेळीं होणें ही देवाधीन गोष्ट आहे. शरीरांतील व मनांतील सारा जोम नाहींसा झाल्यावर जर हा उद्बोध झाला तर त्यापासून कांहीं एक फायदा होत नाहीं. नाड्या ठार बंद पडल्यावर संजीवनीचें तरी काय चालणार ? रुधिराभिसरण थोडें बहुत सुरू असलें; छातीत, हातांत व पायांत तें चालू आहे असें यत्किंचित् जर व्यक्त होत असलें, तरच मात्रांचे वेढे उगाळण्यांत आणि ते जिभेला लावण्यांत कांहीं अर्थ आहे.
 पुष्कळांचा असा समज आहे की, सुधारणेचा आरंभ होणें तो राज- कीय सुधारणेविषयीं फारसा मतभेद असत नाहीं; त्यामुळे ती घडवून आण- ण्यासाठी एकमेकांस मदत करण्याच्या काम एकाचा दुसऱ्याशीं म्हणण्या- सारखा विरोध येऊ शकत नाहीं. स्वातंत्र्य हें सर्वोस प्रिय आहे. आमची राजकीय सुधारणा म्हणजे आमच्या नष्ट झालेल्या स्वातंत्र्याच्या पुनःप्राप्ती- विषय प्रयत्न करणें होय. ही गोष्ट जितकी आम्हां महाराष्ट्रीयांस तितकीच वंगवाश्यांस, गुर्जरस्थांस, तेलंगणस्थांस, कर्नाटकीयांस, पारसीकांस, महंमदी- यांस व इतरांस इष्ट असणें स्वाभाविक आहे, व म्हणून त्यांचें एकीकरण होणें शक्य आहे, व तें होऊं लागलें आहे. सामाजिक व धार्मिक सुधारणांची तशी गोष्ट नाहीं. यासंबंधाने आमची कांहीं प्रिय वस्तु कोणीं नेली आहे, आणि आम्हांस फिरून ती संपादावयाची आहे; असें नाहीं. उलट आमची