पान:Aagarakar.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४१ विविध विचार
विचारकुंडांत पेटलेल्या प्रचंड अग्रीच्या कल्होळांत तुझी आहुति देणाऱ्या नवीन त्विग्वर्गांचा अवतार नुकताच झाला आहे ! तेव्हां जर तुला आपल्या अस्तित्वाची आकांक्षा असेल तर वेळेवर शुद्धीवर ये आणि आमच्या सर्व शरीरभर कांचत असलेले तुझे पाश काढून घे; नाहीं तर भरतखंडांत तुझें नांव देखील राहणार नाहीं !

XXX
७. भागुबाईची वीरश्री

X

 ब्रिटिश सरकारला आपल्या धर्मात हात घालूं देणें बरोबर नाहीं, या विधानांत किती जीव आहे हें पाहूं. धर्मोत हात घालणे म्हणजे त्यांत फेरफार करणें. लोकांच्या अन्य विचारांत फेरफार होत गेले म्हणजे त्यांच्या धर्म- विचारांतही फेरफार होत जातात, हें कोणत्याही धर्माच्या इतिहासावरून सिद्ध करून देतां येणार आहे. पाश्चिमात्य शिक्षणामुळे व इतर कारणांमुळें आम्हांसही आमच्या धर्मात थोडाबहुत फेरफार करावा, असे वाटूं लागलें आहे. तेव्हां हा आतां करायचा कोणीं ? सारे शंकराचार्य निःसत्त्व होऊन बसले आहेत; सरकार परधर्माचे आहे; लोकांस आपण होऊन चळवळ करून नव्या स्मृति घालण्याचें सामर्थ्य नाहीं ! तेव्हां सध्यांच्या स्थितीस अनुकूल असे फेरफार कोण करणार ? प्रतिपक्षी म्हणतात कीं, ते लोकांनी करावे; आम्ही म्हणतों कीं, मोठेमोठे फेरफार सरकारच्या साहाय्यावांचून व्हावयाचेच नाहींत ; निदान आम्हीं जसल्या स्थितीत आहों, तसल्या स्थितीत तरी व्हावयाचे नाहीत. धर्मसंबंधीं फेरफारांचा दुसऱ्या एक दृष्टीनें विचार केला असतां असें दिसून येईल कीं, त्यांपैकीं कांहीं लोकांच्या इच्छेविरुद्ध व कांहीं सहजगत्या होत असतात. 'गाई माराव्या किंवा न माराव्या', ' कलालांची दुकानें घालावी किंवा न घाळाव, ' यात्रांवर किंवा देव- स्थानांवर कर बसवावे किंवा नाहीं, 9 - या व अशा प्रकारच्या इतर गोष्टीं- विषय सरकारने आमचें मत विचारलें नाहीं, व आम्हीं कधीं दिलें नाहीं. घरांतल्या घरांत थोडीबहुत दुरटुर केली असेल, पण उघडपणें असल्या गोष्टींत सरकारास विरोध करण्याचे धैर्य आम्हीं कधींहि दाखविलें नाहीं. या गोष्टी सरकारच्या फायद्याच्या होत्या, आणि त्यानें त्यांविषय आमचें