पान:Aagarakar.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १४०
हातानें द्रौपदीची वेणी घालण्याचा भीमानें केलेला पण आमच्या वाचकांच्या ध्यानांत असेलच !

६. हिंदुधर्माला लहानशी नोटिस

 हे भीषण, बीभत्स, अमंगल हिंदुधर्मा, तुझ्या आज्ञेनें 'आज शेकडो वर्षे स्मशानभूमीत आम्हीं जीं क्षीरें केलीं, डोळ्यांतून पाणी गळत असतां कण- कीचे गोळे करून जे प्रेताच्या अनेक भागांवर ठेविले; क्रव्यादानीच्या भयाण 'ज्वाला भोंवर्ती मातीच्या गळत्या घागरी डोक्यावर घेऊन ज्या प्रदक्षिणा घातल्या व उत्तरीने गळ्यांत दगड बांधून घेऊन व तोंडाला हात लावून तुझ्या नांवानें काढू नये तसले जे ध्वनि काढले, त्या सर्वाबद्दल तूं आम्हांस "काय दिले आहेस १ निर्दय वंचका ! गाईचे दूध पिणे, नानाप्रकारचे जिन्नस यथेच्छ खार्णे, पालखींत किंवा घोड्यावर बसणें, जोडा घालून सहल करणें, शेवाबरोबर जाळलेल्या प्रियपत्नीच्या केसाच्या धुराच्या वासावरूनच जी आपणास प्राप्त झाली आहे अशी कल्पना करून तिच्यासमवेत शय्येवर विहार करणें किंवा विश्रांति घेणें, मृत्युलोक सोडून वायुरूपानें पातालाकडे किंवा स्वर्गाकडे संचार करीत असतां कोणी शत्रु भेटला तर तलवारीनें किंवा सोडग्यानें त्याचा समाचार घेणें, व अनेक प्रकारच्या दुर्गंधी द्रव्यांच्या समुद्रां- तून प्रवास करण्याचा प्रसंग आला असतां दर्भाच्या होडग्यांत बसणें, अथवा तहान लागली असतां मडक्यांत घालून दिलेल्या पाण्यानें ती भाग- विणें - असल्या गोष्टी मेलेल्या मनुष्याच्या आत्म्याकडून किंवा जिवाकडून घेण्याचा संभव तरी आहे काय ? मुळींच नाहीं. पण जबरदस्त पंचाक्षय- प्रमाणें आम्हा सान्या अज्ञ लोकांस त्वां भारून टाकून केवळ गुलाम केलें असल्यामुळे, आज कित्येक युगें अगर्दी अशक्य गोष्टी आम्ही शक्य मानीत ग्रहों, व अत्यंत निंद्य कृत्यें वंद्य मानून तुझ्या संतोषाकरतां तीं बेलाशक करीत आहों ! पण ध्यानांत ठेव; या तुझ्या अश्लाघ्य व निर्घुण वर्चस्वाच अंत होण्याचा काल अगदीं समीप येऊन ठेपला आहे ! आजपर्यंत त्वां आम्हांस ज्या असह्य यातना भोगण्यास लाविलें आहेस, व जीं अनन्वित कर्मों आम्हांकडून करविली आहेस त्या सर्वाबद्दल तुझ पाळेंमुळें खणून काढून