पान:Aagarakar.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार SAAAAAA AAAAeMAee Ae eMAeAe eMAe eMAAAA ്പനാസ്സസ് സ്പ AeeMAAASA SAASAASSAAAAAAeYAeMA AMAAA AAAA S AAAAAeeeAAASAASAASAASAAAS लोकांच्या मनावर काय परिणाम होईल व आपल्या शाळेचें आणि छापखान्याचें किती नुकसान होईल; आणीबाणीच्या प्रसंगीं आपणांस कोणकोण मित्र उपयोगी पडले व पुढें कोणाकोणाच्या मदतीवर आणि शब्दावर अवलंबून राहातां येईल; आतांप्रमाणे फिरून तुरुंगांत न येण्यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी ठेवली पाहिजे; फिरून तुरुंगांत यावें लागलें तरी ज्या गोष्टी केल्याच पाहिजेत अशा गोष्टी कोणत्या; वगैरे, नाहीं नाहीं त्या विषयांवर आमचा एकेक वेळ एवढ्या जोरानें वाद चाले कीं-' अरण्यांत राम आणि सीता यांच्या गोष्टी थांबत असतील त्या पहांटे जाग्या झालेल्या पांखरांच्या गोड किलबिलाटानें. टिळक-आगरकर तेवढे भाग्यवान् नव्हते ! त्यांच्या गोष्टी जोरजोरानें सुरू झाल्या कीं आसपासचे शिपाई ' हळु बोला, हळु बोला’ असा त्यांना इशारा करीत. तो इशारा त्यांना ऐकावाच लागे. पण इतकें झालें तरी बोलतां बोलतां रात्र संपून जाई ! २ रामचंद्राच्या जीवनाशीं आगरकरांच्या आयुष्याचे असलेले साम्य केवळ या क्षणिक भावपूर्ण अनुभूतीपुरतेंच मर्यादित नाहीं. एक प्राचीन काळीं स्वतंत्र आर्यावर्तांत जन्मलेला युवराज होता. दुसरा एकोणिसाव्या शतकांत गुलाम झालेल्या हिंदुस्थानांत एका दरिद्री कुटुंबांत जन्म पावलेला मुलगा होता. पण या दोघाही लोकोत्तर पुरुषांच्या कपाळीं विधात्यानें वनवास लिहून ठेवला होता, एकानें लोकानुरंजनाकरतां प्रियपत्नीचा त्याग करून दुःखाला मिठी मारली, तर दुस-यानें लोकजागृतीकरतां अंध समाजाचा रोष पत्करून आणि जीवश्चकंठश्च मित्राचा आमरण विरोध स्वीकारून या जगांत ध्येयवाद्याला दु:खाशिवाय दुसरा सोबती मिळत नाहीं हें पुन्हां सिद्ध करून दाखविलें. या दोघांच्या काळांत अनेक शतकांचे अंतर असले तरी त्यांचा प्रकृतिधर्म एकच होता. दोघांचीही ध्येयनिष्ठा सारखीच उत्कट होती. दोघेही सत्याचे उपासक, दोघेही आदर्शांचे भक्त ! दोघेही ध्येयाकरितां हंसतमुखानें स्वसुखाच्या आहुत्या देणारे ! भवभूतीच्याच शब्दांत सांगायचें तर दोघांचीही मनें वज्रापेक्षां कठोर व फुलापेक्षां कोमल होतीं. असल्या उदात्त आणि उत्कट मनाची प्रवाहपतित जगाला आणि शेंकडों श्रुखलांनी