पान:Aagarakar.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

३. केल्याने होत आहे रे

१३६  विचाराने चांगली गोष्ट कोणती व वाईट गोष्ट कोणती याचा पूर्ण निश्वय करून वाईट टाकण्याचा व चांगली स्थापण्याचा प्रयत्न एका बाबींत केला असतां जें धैर्य अंगी येतें तेंच पुढें तसली दुसरी गोष्ट करण्यास प्रवृत्त करतें आणि ही दुसरी गोष्ट करतांना धैर्याचें भांडवल पहिल्यापासूनच अधिक असल्यामुळे, पहिल्या प्रसंगाहून विशेष सुलभ रीतीनें यशः प्राप्ति होते. या- प्रमार्णे एका गोष्टींत यश आलें, दुसरींत आलें, तिसरीत आलें असें होतां होतां नवीन नवीन गोष्टी करण्याचें धैर्य दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाऊन त्याचा पाहिजे त्या कार्मी उपयोग करण्यास उल्हास वाटूं लागतो. उन्हाळ्याच्या प्रत्येक दिवसास भूमितिश्रेढीने वाढत जाणाऱ्या उष्णतेप्रमाणें मानसिक वैर्याची गोष्ट आहे; तें प्रत्येक दिवशीं अधिकाधिक होत जातें. तें कमी होऊं लागलें म्हणजेही भूमितिश्रेढीनेंच कमी होतें ! ज्याप्रमाणें आकाशांत फेकलेला दगड खालीं येऊ लागला म्हणजे प्रत्येक क्षणास मागल्या क्षणापेक्षां अधिक फूट उतरतो त्याप्रमाणें कोणत्याही कारणानें राष्ट्राच्या किंवा त्यांतील एखाद्या व्यक्तीच्या मनास भयानें घेरले म्हणजे तें क्षणोक्षणी त्यास अधिकाधिकच ग्रासीत जातें !

XXX
४. आजची सामाजिक असमता

 विचार करणें, सुखदुःखाचा अनुभव घेणें व क्रिया करणें या तीन गोष्टींपैकीं पहिलीत, दुसरींत, किंवा तिसरींत प्रत्येक मनुष्य चूर होऊन गेलेला असतो. मोठमोठ्या ग्रंथांचीं पारायणे करावीं; रात्रीच्या रात्री चिंत- नांत घालवाव्या, विचार व्यवस्थित झाला कीं, तो पुस्तकद्वारानें किंवा दुसन्या कोणत्या तरी साधनाने लोकांपुढे आणावा. अशा रीतीनें कित्येक लोक आपली आयुष्य कंठीत असतात. अशांस बाह्य सुखांचा फार उपयोग सांप- डत नाहीं, व बाह्य क्रिया करतां येत नाहीं. वाचनापासून होणारा जो आनंद तोच यांचें स्थाईक व आवडते सुख आणि विचार करण्यास व लिह- ण्यास लागणारी जी शारीरिक हालचाल तीच यांची बाह्य क्रिया. दुसरा वर्ग सुखाभिलाषी लोकांचा यास मानसिक सुखापेक्षां शरीरसुखाची चाड