पान:Aagarakar.pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गोपाळ गणेश आगरकर
 

मानवी हृदयाच्या आर्ततेचें प्रतिबिंब दर्शविणारा ! उत्तरराम शिकत असतांनाच मी वाचीत असलेल्या ' डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे एकशें एक दिवस' या आगरकरांच्या छोट्या पुस्तकांत हें प्रतिबिंब स्पष्टपणें मला दिसलें.

एक अरण्यांतली रात्र; दुसरी तुरुंगांतली रात्र. दोन्ही रात्रींत तीन चार हजार वर्षांचे अंतर. तिथे पति पत्नींच्या गोष्टी चालल्या होत्या; इथे जीवाभावाचे मित्र बोलत होते ! त्या दुस-या रात्रींच्या गोष्टीची अवीट गोडी आगरकरांच्या तोंडूनच ऐकली पाहिजे. ते म्हणतात, " मी एम्. ए. करिता व टिळक एल्एल्. बी. करितां अभ्यास करण्यासाठी कॉलेजांत राहिलों असतां सरकारी नोकरी न पतकरतां देशसेवेत आयुष्य घालविण्याचा ज्या दिवशीं निश्चय केला त्या दिवसापासून आम्ही जें जें बोललों चाललों होतों त्याची पुन: पुन: आठवण होऊन अनेक वेळां पुनरावृति होत असे. अमुक गृहस्थाला कॅंपमध्ये भेटायला गेलों असतां परत येतांना काळोखांत वाट चुकून बारावर दोन वाजण्याच्या सुमारास फिरतां फिरतां बंडावर कसे येऊन ठेपलो; शाळेच्या संबंधानें विष्णुशास्त्र्यांशी बोलणें लावण्यास गांवांत गेलो असतां कॉलेजाला परत येताना थंडीनें किती कुडकुडलो; वचन दिलें असतां शाळा आणि छापखाना काढला त्यावेळेस कोणकोणत्या लोकांनीं मागें घेतलें; असल्या फंदांत न पडणारे कोणकोण मनुष्य त्यांस घेरतां आले; आपले मूळचे हेतु कोणते व ते कितपत सिद्धीस गेले आहेत; शास्त्रीबोवांच्या अकालीं मृत्यूनें आपल्या उद्येागांस केवढा धक्का बसला; आम्हीं आरंभिलेली कामें आमच्या हयातीत व आमच्या पाठीमागें कित्येक वर्षें अप्रतिहत चालली तर आमच्या देशस्थितीवर त्यांचा काय परिणाम होईल; या देशावर इंग्रजांचे राज्य झाल्यानें त्याचे कोणकोणत्या बाबतींत हित आणि अनहित होत आहे, लोकाशक्षण उत्तरोत्तर जारीनें पसरत गेलें तर हिंदुस्थानची भावी स्थिति काय होईल; नेटिव संस्थानांची सुधारणा होण्यास काय उपाय करावे; देशभाषा युनिव्हर्सिटींत आणण्याला कोणती युक्ति काढावी, शाळा आणि कॉलेज बांधण्यास पैसे कसे गोळा करावे; कोल्हापूरप्रकरणात आपली चूक किती आणि आपणांस भोगावी लागत असलेली शिक्षा किती न्याय्य आहे; आपण या तऱ्हेने येथे अडकून राहिल्यानें