पान:Aagarakar.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मूळ पाया चांगला पाहिजे
 धर्मसुधारणा, आचारसुधारणा, राजकीय सुधारणा वगैरे सर्व केवळ व्यवस्थेकरितां केलेले आहेत. त्यापैकी अमुकास पहिला नंबर, अमुकास दुसरा नंबर, अमुकास तिसरा नंबर, असें कांहीं ठरवितां येणार नाहीं. ते सर्व । मनुष्यांच्या वेगळाल्या व्यवहाराचे व्यंजक होत व त्या सर्वोची एकसमया- वच्छेदेंकरून सुधारणा होत जाणें, म्हणजेच मनुष्यांची किंवा त्यांनी वस- विलेल्या राष्ट्रांची सुधारणा झाली, असें म्हणतां येईल, हे आम्ही वेळोवेळी ' दाखविलेच आहे. परंतु तें सर्वोत संमत नाहीं, असे भोवतालच्या स्थिती- वरून दिसतें. कित्येकांस वाटतें कीं, राजकीय सुधारणा सोपी आहे. सामा- जिक सुधारणेविषयीं जगीं रणें पडतात, तशी या राजकीय सुधारणेची गोष्ट नाहीं. त्याविषयी सर्व लोकांचें एकमत आहे. याकरितां सामाजिक सुधारणे- विषयीं व्यर्थ खटपट करून, लोकांच्या शिव्याशापास पात्र होण्यापेक्षां व आपसांत कलह माजवीत बसण्यापेक्षां सर्वांनी एकदिलाने राजकीय सुधार- णेच्या मार्गे लागावें, हा उत्तम पक्ष होय. वरील उपदेश योग्य आहे, अशी आमची खात्री असूनहि, लोकसमुदायास न दचणाऱ्या गोष्टी आम्ही आग्र- हानें पुढे आणीत असत, तर त्यांत आमचाच दोष झाला असता. परंतु वरील उपदेश करणारांनी नुसती वर वर नजर दिली आहे; त्यांनी शांतपणानें विचार केला असतां, त्यांचें मत खचित आमच्याप्रमाणे झाल्यावांचून राहा- णार नाहीं, व तें होईपर्यंत, ज्या राजकीय सुधारणेपासून आपले सर्व पुरु- पार्थ आपणांस प्राप्त होतील अशी कित्येकांची समजूत आहे, ती राजकीय सुधारणाही होणें शक्य नाहीं, हे आम्ही दाखवणार आहो
 राजकीय सुधारणा आम्हांस पाहिजे, असे आम्ही कां म्हणतों ? तर त्यापासून नफा होईल असे आम्हांस वाटतें म्हणून. सामाजिक सुधारणा आम्हांस का नको ? त्यापासून आमचे नुकसान होईल असे आम्हांस वाटतें म्हणून तात्पर्य कोणती गोष्ट इष्ट आहे, आणि कोणती गोष्ट इष्ट नाहीं, हें आपण केवळ नफातोट्याच्या तारतम्यावरूनच ठरवितों व