पान:Aagarakar.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

११४

देशांत नाहीं, व या सैन्यावर होणाऱ्या धिप्पाड खर्चाचा बराच भाग हिंदु लोकांच्या खिशांत पडत नाहीं. जवळ जवळ याचप्रमाणे इतर खात्यांचीही व्यवस्था आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या पाऊणशे किंवा ऐशी कोटी उत्पन्नां - पैकी सुमारे दोन तृतीयांश उत्पन्नापासून आम्हांस द्रव्यद्वारां कवडीचाहि मोबदला मिळत नाहीं, असें म्हणण्यास हरकत नाहीं . ) असा प्रकार एक वर्ष नाहीं, दोन वर्ष नाहीं, सुमारे शंभर वर्षे चालला आहे. या शंभर वर्षांत हिंदुस्थानचें उत्पन्न सरासरीने चाळीस कोटी पडलें असें धरिलें, आणि त्याचा फक्त अर्धा भाग प्रतिवर्षी इंग्लिश लोकांच्या खिशांत अचानक पडला असें मानिलें, तरी एका शतकांत दोन निखर्व रुपये या देशांतून परदेशांत गेले, असा हिशेब होतो. ज्या देशाच्या द्रव्याला असा पाझर लागला आहे त्या देशांतील लोकांना अन्नान्नदशा प्राप्त होणें हें किती स्वाभा- विक आहे ? इंग्रजी राज्यापासून या देशावर घडणाऱ्या या भयंकर परि गामाची पुरी कल्पना ज्यांच्या मनात पक्की बिंबली असेल त्यांना आणखी पांच पंचवीस वर्षे असाच क्रम चालू राहील तर हिंदुस्थानांतील लोक एकमेकांस खाऊं लागतील. किंवा भुकेच्या दुःसह यातनांमुळें बेफाम होऊन जाऊन ते आपल्या राज्यकर्त्यांचें जूं झुगारून देण्यास प्रवृत्त होतील, असे डोळ्यांपुढे ढळढळीत दिसून आल्यावांचून राहील काय ? व ज्यांच्या अंत:- करणांत ग्वऱ्या देशाभिमानाचा व खऱ्या मनुष्यपणाचा कांहीं अंश आहे, त्याला ही गोष्ट उघडपणे बोलल्यावांचून रहावेल काय ? ह्यूमसाहेबांनीं आपल्या पत्रांत याहून अधिक काय म्हटलें आहे ? हिंदुस्थानच्या भयप्रद दारिद्र्याचें त्यांत जे भयंकर चित्र काढिलें आहे तें खोटें आहे असें म्हण- ण्याची कोणाची छाती आहे ? दादाभाई नौरोजी, सर एव्हेलिन बेअरिंग, डॉक्टर इन्टर, सर चार्लस डिल्क वगैरे बहुश्रुत गृहस्थ तर राजद्रोही नाहींत ना ? पण त्यांनी प्रसिद्ध केलेल्या हिशेबांवरूनही असें उघड होतें कीं, ब्रिटिश अंमलांतील मनुष्याचें वार्षिक उत्पन्न सरासरीनें तीन रुपयांपेक्षां अधिक नाहीं ; तसेंच हिंदुस्थानांतील निम्मे किंवा दोनतृतीयांश लोक अर्ध्या पोटी सारा जन्म काढतात ! राजनिष्ठ लोकांनीं अशी जबानी दिली असून अँग्लो- इंडियन पत्राबरोबर आमच्या लोकांनी हयूमसाहेब अतिशयोक्ति करतात, ह्यूमसाहेब पराचा कावळा करतात, वार्धक्यामुळे हयूमसाहेबांना वेड लागल्या.