पान:Aagarakar.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

११२

 देशोन्नति, देशकल्याण वगैरे गोष्टी थोडीबहुत अंगास झीज लाऊन घेतल्या- खेरीज फुकाच्या पोकळ गप्पा मारून होत नाहींत हे आम्ही पक्के संमंजत आहों. ती लावून घेण्यास आम्ही तयार आहों. प्रयत्न करणें आमचें काम आहे; यश येणें न येणें बाह्योपाधींवर अवलंबून आहे. त्याचा आम्ही विचार करीत नाहीं. येवढें सांगून व त्या महात्म्याला परलोकीं सर्वोत्कृष्ट शांति आणि कल्याण चिंतून हा लेख आटोपतों.