पान:Aagarakar.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

१०४

होण्यासह सैबेरिआ, रशिआ, व उत्तर जर्मनी यांतील व्हांडाल, गाथ्स, सिथिअन्स, व इन्स ( हूण ) वगैरे हापापलेल्या रानटी लोकांची भूकच कारण झाली. फेडरिक धी ग्रेटनें ज्या मोठमोठ्या लढाया मारल्या त्या सायलेशिआ प्रांताची सुपीक जमीन उपटून आपल्या प्रजेची भूक भागविण्यासाठीच होत. १८ व्या शतकाच्या अखेरीस नेपोलिअन बादशहानें युरोप खंडांत जो भयं- कर मनुष्यहोम मांडिला त्याला फ्रेंच लोकांची अन्नान्नदशा कारण झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. पृथ्वीच्या सर्व भागांत इंग्लिश लोकांच्या वसाहती होण्यास, व हिंदुस्थानचें राज्य त्यांच्या हातीं जाण्यास इंग्लंडांत प्रजावृद्धि फार होऊन तिचा त्या लहान बेटांत होणाऱ्या उत्पन्नावर नीट चरितार्थ चालेना, हेंच कारण होय. फार कशाला, सध्यां ( १८८३ ) फ्रान्स व चीन या देशांत लढाई होण्याचा जो प्रसंग दिसत आहे, त्याच्या मुळाला देखील ही पोटाची खळी आहे. ज्यांना अर्वाचीन सुधारणाची घमंडी वाटत असेल त्यांना आमचा येवढाच प्रश्न आहे कीं तुमच्या या सुधारणांपासून पृथ्वीवर जितकी प्रजा आहे तितकीचा सुखानें जर चरितार्थ चालत नाही तर त्यांचा काय उपयोग ! आयर्लंडांत पोट भरेनासे झाल्या- मुळे प्रत्येक वर्षी लाखों ऐरिश लोकांना चरितार्थाच्या सोईसाठी स्वदेश सोडून अमेरिकेत किंवा पृथ्वीच्या दुसऱ्या एखाद्या ओसाड प्रदेशावर जावें लागत आहे, ही गोष्ट मनांत आली म्हणजे ज्या सुधारणांबद्दल अलीकडे इतकी वल्गना होत असते, त्यांचें कांहींच गोरख वाटत नाहीं. एकंदरीत स्थूल दृष्टीनें सृष्टीचें अवलोकन केलें तर असें दिसून येईल की जीवकोटी- तलि हरएक प्राणिवर्गाच्या अंगी प्रजोत्पादनाची बुद्धि स्वभावसिद्ध होऊन गेली असल्यामुळें जेथें तेथें उदरपोषणासाठी मारामारी चालली आहे. 'अत्तं वांछति शांभवो गणपतेराखूं क्षुधार्तः फणि:' इत्यादि जुन्या वाक्यां- कडे नजर फेंकली असतां सर्व सृष्टीभर हा 'जीवनार्थ कलह ' कशा वेगानें चालला आहे, हें तेव्हांच ध्यानांत येणार आहे. प्रत्येक वरचा प्राणिवर्ग खालच्या बहुतेक प्राणिवर्गास आपले भक्ष्य करितो व सर्वांत श्रेष्ठ प्राणिवर्ग त्याच्या दाढांतून कोणताहि जीव भी सुटून जाईन म्हणेल तर घडणें नाहीं. भुकेच्या झपाट्यांत मनुष्यांनी घोडीं पाहिलीं नाहींत, कुत्रीं पाहिलीं नाहींत, पोरें देखील नाहींत ! जठराग्नीचा दाह शमन करण्यासाठी त्यांनी उदरकुंडांत