पान:Aagarakar.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

१०२

खपेल अशी आमची खात्री होईल, तर भरतभूमीस आपली लाज झांकण्यासाठी इंग्लंडचा धांवा करावा लागणार नाहीं इतकेंच नाहीं, तर या व इतर खंडांत ज्या भूमिका उघड्या पडल्या असतील, त्यांच्या शरीरावर ही भरतभूमि, आपले एक अंगुष्ठ देखील उघडें पहूं न देतां, हव तितकीं वस्त्रे घालील ! पण लॅकेस्टरच्या व्यापान्यांनीं हिंदुस्थान सरकारास असें करूं देणें म्हणजे स्वार्थरूप बाभळीच्या झाडाला अघटित घटनेनें फणस किंवा आंबे येण्यासारखें होय !