पान:Aagarakar.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०१

भांडवल गेले; व्यापार गेला !


जें काम मिळतें, तें येथें जेमतेम दोन इसमांस मात्र मिळतें ! अशा स्थितीत दुष्काळ आल्याबरोबर, लाखों लोकांस अन्नान्न करीत परलोकप्रयाण करावें लागतें, यांत कांहीं नवल आहे काय ? आमव्या व्यापाराची ही हृदयभेदक स्थिति समंजस इंग्लिश लोकांपुढे आणिली म्हणजे ते असा अभिप्राय देतात कीं, हिंदुस्थानची व्यापारवृद्धि झाली पाहिजे. तीवांचून दुसरा तरणोपाय नाहीं ! पण ही व्यापारवृद्धि कशी होणार, याचा मात्र विचार करण्यास कोणीं धजूं शकत नाहीं ! कारण तो करूं लागलें कीं, इंग्लंडच्या व्यापारावर थोडीबहुत गदा येईल, निदान त्याला थोडाबहुत तात्कालिक तरी धक्का पोहोचेल, अशा साधनांचा उपयोग केल्याशिवाय, हिंदुस्थानच्या व्यागर- धंद्यास सांप्रत स्थितींत उत्तेजन देणे अशक्य आहे, हे दिसून येतें. तसें करण्याची आजमितीस कोणाची प्राज्ञा आहे ? परोपकाराच्या लांब लांब गप्पा मारणें फार सोपें आहे ! व्यक्तीपेक्षां राष्ट्रास ही गोष्ट विशेष तन्हेनें लागू पडते इंग्लंडने आमचे व्यापार आटोपल्यामुळें, आमचें केवढें नुक- सान होत आहे, हें जोपर्यंत इंग्लंडचा माल येथें खपत आहे तोपर्यंत इंग्लिश व्यापारी कशासाठी मनांत आणतील ? ज्या वेळेस येथें एखादा मोठा दुष्काळ पडून, किंवा टाइम्स ऑफ इंडिआने म्हटल्याप्रमाणे, दारिद्र्यानें पिळून काढलेल्या व भुकेनें गांजून गेलेल्या लोकांचे एखादें प्रचंड बंड होऊन, त्यांच्या व्यापारास एकाएकीं मोठा धक्का बसेल, व कोट्यवधि रुपयांचे नुकसान होईल, तेव्हां कोठें त्यांचे डोळे उघडणार ! तसें नसेल तर येथील व्यापाराची वृद्धि करणें काय कठिण आहे ? एकट्या कापसाच्या व्यापारास थोडेसें उत्तेजन दिलें तरी देखील आम्हांस आलेली अन्नान्नदशा कांहीं वर्षे दूर होणार आहे. इतकेंच नाहीं, तर अफूचा व्यापार बंद झाल्यास हिंदु- स्थानच्या जमाबंदीच्या तटात जें पांचसात कोटींचें अवाढव्य भगदाड पडण्याचा रंग दिसत आहे तेंहि बऱ्याच अंशी भरून काढतां येणार आहे. अशा प्रसंग इंग्लंडहून येणाऱ्या कापडावर जबर जकात ठेवण्यास काय हरकत आहे ? तसें केल्यास, जमाबंदीस बरीच मदत होऊन, येथील काप- साच्या कारखान्यांसहि बरीच मदत होणार आहे. वास्तविक पाहतां काप- साची, मजुरांची व कापसाच्या कारखान्यांत लागणान्या भांडवलाची आमचे पाश इतकी समृद्धि आहे कीं, जर उत्पन्न केलेला माल हटकून