पान:Aagarakar.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९

भांडवल गेलं; व्यापार गेला !

कारागिरांस किंवा व्यापाऱ्यांस विशेष भेद वाटला नसेल, हे उघड आहे. पण सध्यांची स्थिति तशी नाहीं. इंग्लिश लोक ज्या वस्तू वापरतात, त्यांपैक बहुतेक इंग्लंडाहून येतात. इतकेंच नाहीं, तर त्यांच्या यंत्रकृत वस्तू आमच्या इस्तकृत वस्तूंहून अधिक सवंग व सफाईदार असल्यामुळे आमच्या उप- योगास लागणाऱ्या वस्तूंपैकी अनेक वस्तूहि आम्ही इंग्लंडापासूनच खरेदी करतों. यामुळे येथील कारागिरांस इवें तितकें काम मिळेनासें झालें आहे. याशिवाय, ज्या खर्चाबद्दल आम्हांस एका कवडीचाहि मोबदला मिळत नाहीं, असाहि पुष्कळ खर्च होत आहे. या सर्व खर्चाचा ' होम चार्जेस' या नांवाखालीं समावेश करण्यास हरकत नाहीं. यांत हिंदुस्थानास असलेल्या कर्जाबद्दल व्याजाची जी रक्कम प्रतिवर्षी इंग्लंडास पाठवावी लागते ती; नोकरी आटोपून किंवा सोडून गेलेल्या नोकरांची पेन्शनें; सेक्रेटरी ऑफ् स्टेटच्या कौन्सिलाचा खर्च आणि यासारख्या ज्या इतर बाबी आहेत त्या येतात. या सर्वाबद्दल गेल्या वर्षी सेक्रेटरी ऑफ स्टेट यानें आम्हांपासून तेवीस कोट रुपये घेतले ! हिंदुस्थानच्या काळांचा एकंदर वसूल एको णीस कोटि रुपये आहे. तेव्हां हिंदुस्थानच्या जमिनीचें सारें उत्पन्न जरी त्या प्रचंड अधिकाऱ्यांस अर्पण केलें तरी देखील त्यांचें पोट भरत नाहीं, हें उघड आहे. त्यांचें समाधान होण्यासाठी आणखी चार कोटि रुपये कोठून तरी काढून द्यावे लागतात ! म्हणजे हिंदुस्थानच्या नक्त उत्पन्नापैकीं पक्के अ उत्पन्न इंग्लंडांत जात असून, त्याबद्दल आमचा काडीचा देखील फायदा होत नाहीं; व असा क्रम कमी अधिक प्रमाणानें आज शंभर वर्षे चालला आहे ! या गोष्टी ज्याला समजल्या असतील त्याला 'आम्ही इतके दरिद्री कशासाठीं ' र्हे तेव्हांच कळून येणार आहे. इंग्लिश लोक मोठे उद्योगी, कल्पक, साहसी व बुद्धिमान् आहेत, व या गुणांमुळेच त्यांनी आपला देश सुवर्णमय करून टाकला आहे, हें निर्विवाद आहे. तथापि या पुराण सुवर्णभूमीतील बरेंच सुवर्णहि त्यांच्या संपत्तिमत्त्वास कारण झालें आहे, हें त्यांचे त्यांनाच कबूल करावें लागेल; पण ज्या मानानें ते आमच्या देशांतून प्रतिवर्षी उत्पादक संपत्ति तिकडे नेत आहेत, त्या मानानें आमची कंगालता अधिकाधिक दाट होत जाऊन, आमचे व्यापार बंद पडत चालले आहेत; पोटभर अन्न व अंगभर वस्त्र न मिळाल्यामुळें, नाना'