पान:Aagarakar.pdf/118

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भांडवल गेलें; व्यापार गेला. ज्याप्रमाणें शरीराला अन्नाची त्याप्रमाणे व्यापाराला भांडवलाची आवइयकता आहे. ज्या देशांत भांडवल नाहीं, तेथे व्यापार कोठून चालणार ? मुसलमान लोकांनी येथे अनेक शतकें राज्य केले. पण त्यांच्या त्या दीर्घकालीन अंमलानें आम्ही जितके डबघाईस आलों नाहीं, तितकें या शतसांवत्सरिक ब्रिटिश अंमलानें आली आहों. याचे कारण उघड आहे. तैमूरलंग झेंगीजखान, गिझनी महंमद यांनी या देशावर ज्या स्वाच्या केल्या, त्यांमुळे आमचे अतोनात नुकसान झालें हें खरें आहे. पण तें नुकसान, ब्रिटिश अंमलामुळे आमचे जें नुकसान होत आहे त्यापुढे कांहींच नाहीं, असें म्हणण्यास हरकत नाही. मुसलमान लढवय्यांनीं जें द्रव्य लुटून नेलें तें सांचविलेलें द्रव्य होतें. त्याचा व्यापाराशीं तादृश्य संबंध नव्हता. शंपन्नास वर्षानीं एखादी झुंड येऊन कोटि दोन कोटि रुपयांची लूट घेऊन गेली तर तीपासून होणारें नुकसान आणि प्रतिवर्षी उत्पादक संपत्तीपैकीं बाहेर जात असलेल्या दहापांच कोटॉपासून होत असणारं नुकसान यांचे साम्य कोठून होणार ? तसेच हेंहि ध्यानांत ठेवणे जरूर आहे कीं, मुसलमानांचा अंमल येथे कायम झाल्यापासून, येथला पैसा बहुधा बाहेर गेला नाहीं. इंग्रजांप्रमाणे मुसलमान पिशवी भरली कीं विलायतेस पळणारे नसल्यामुळे, त्यांच्या अंमलापासून द्रव्यदृष्टया आमचे म्हणण्यासारखें नुकसान झालें नाहीं. आतांप्रमाणें त्या वेळेस मोठमोठ्या हुद्यांच्या जागा जिंकणाच्यांच्या जातभाईस मिळत असत. परंतु त्यांचे नेहमींचे राहणे येथे पडल्यामुळे, त्यांचा सारा खर्च येथेच होत असे व त्यामुळे व्यापारधंदा करणाच्या लोकांस किंवा कारागीर लोकांस मोठे नुकसान झाल्यासारखें वाटत नसे. मशीदीचे दगड घडावणे किंवा देवळाचे दगड घडविणे; ताजमहाल बांधणें किवा० काशीविश्वेश्वराचे देऊळ बांधणें; पेशव्यांसाठीं शालजोड्या विणणे किंवा बादशहाकरितां मोलाचे गालीचे तयार करणे, मस्तानीसाठी निवडक जवाहीर विकर्णे किंवा नूरजहानच्या सांगण्थावरून सारा देश धुंडाळून पाचेचे सर्वोत्कृष्ट खडे पैदा करणे-यांत त्या,त्या