पान:Aagarakar.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कवि, काव्य, काव्यरति

अशी कोणतीही चीज नाहीं कीं, जिच्या सत्यस्वरूपाचें ज्ञान आनंद होईल अशा रीतीने कवीस तुम्हांला करून देतां येणार नाहीं. समजातीयांस ज्ञान करून देणें हा कवींचा व्यवसाय होय. या व्यवसायांतच त्यांचा आनंद ( आहे. या व्यवसायामुळेच त्यांचे अंतःकरण अतिशय कोमल व दयार्द्र झालेलें असतें.