पान:Aagarakar.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९३

कवि, काव्य, काव्यरति

त्यक्ष असें म्हणतां येईल. ज्याला ही छाया हवी तितकी दाट पाडून घेतां येत असेल, त्याच्या अंगीं कवित्वगुणांपैकीं श्रेष्ठ गुण आहे, असें म्हणतां येईल. विचारानें प्रत्यक्ष सुखदुःखाच्या तीव्रतेचें पूर्ण प्रतिबिंब आपल्यावर उठवून घेणें याचेंच नांव तादात्म्य, तंद्री किंवा एकतानता. ज्याला सुख- दु:खाचा प्रत्यक्ष अनुभव होत आहे, त्याच्या मनाप्रमाणें कवीच्या मनाची स्थिति झाल्याशिवाय त्याच्या काव्यांत तो तो रस पूर्णपणे उतरणार नाहीं. रसाची परिपक्वता अगोदर कवीच्या मनांत आली पाहिजे. ती तशी झाली तरच त्याला ती काव्यांत आणण्याचा प्रयत्न करतां येईल; कारण, जर आडांतच पाणी नसले, तर तें पोहऱ्यांत कोटून येणार ? कवीला ज्या विषयाशीं आपल्या मनाची तंद्री लावून घ्यावयाची असते, तो विषय अनुकूल संवेदनोत्पादक असो, कीं प्रतिकूल संवेदनोत्पादक असो, त्याला जे कष्ट पडतात, ते उभयपक्षी सारखेच असतात. कवीचें मन फोटोग्राफ घेण्यासाठीं तयार केलेल्या भिंगाप्रमाणें असतें. ज्याप्रमाणे हवा तेवढा प्रकाश अनुकूल असला म्हणजे पाहिजे त्या पदार्थांर्चे हुबेहूब प्रतिबिंब त्या भिंगावर पाडतां येतें, त्याप्रमाणें ज्या कवीला आपली कल्पना हवी तितकी प्रज्वलित करतां येते, त्याला तिच्या रश्मींनीं आपल्या मनावर पाहिजे त्या विषयाची मुळाबरहुकूम छाया पाडतां येते. कल्पना प्रज्वलित होऊन कल्पनाविषयाशी तादात्म्य होणें - यांतच कवीचा आणि काव्यवाचकांचा आनंद आहे. बीजगणितांतील किंवा भूमितींतील एखाद्या कूट प्रश्नांत बुद्धि व्यग्र होऊन गेली असतां तींत जे चांचल्य उत्पन्न होतें तें तत्त्वशोधकांस जसें अत्यंत आनंददायक असतें, त्याप्रमाणे सुखदुःखोत्पादक विषयांचे हुबेहुब आकलन करण्यासाठी भरघांव सोडलेल्या कंल्पनेच्या चांचल्यापासून कवींना व काव्य- वाचकांना अत्यानंद होतो. असें जर नसतें, तर दुःखपर्यवसायी काव्यें कवि मुळींच न लिहिते, व वाचक तीं मुळींच न वाचते. तेव्हां सिद्ध काय झालें कीं, काव्य दुःखपर्यवसायी असो की सुखपर्यवसायी असो, त्यांतील रसा- पासून उत्पन्न होणारा आनंद सारखाच असतो; आणि याच कारणांमुळे कॉमिडी आफ एरर्स (भ्रांतिकृतचमत्कार ) इतकींच आयेल्लो वाचण्याला, किंवा त्याचा प्रयोग पहाण्याला आमचीं मनें उत्सुक असतात. तर मग दुःखपर्यवसायी आणि सुखपर्यवसायी काव्यांच्या वाचण्यांत किंवा