पान:Aagarakar.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८५

आयर्लंडाकडे पाहून तरी जागे व्हा

वरील पाहिजे त्या जुन्या किंवा नव्या राष्ट्राच्या इतिहासाकडे पहा; वर सांगितलेल्या तत्वाचा त्यांत तुम्हाला प्रत्यय आल्यावांचून रहाणार नाहीं.
 मनुष्यें समाज करून_राहूं लागलीं, म्हणजे त्यांच्यांत परस्परावलंबन स्वाभा विकपणें उत्पन्न होतें. समाजांत राहणाऱ्या मनुष्यास थोडें बहुत पारतंत्र्य किंवा परावलंबन भोगण्यास नेहमी तयार असलेच पाहिजे. समाज व्यवस्थितपणें । चालून, त्याचें पाऊल एकसारखें पुढे पडत जाण्यास जितक्या पारतंत्र्याची आवश्यकता आहे, तितकेंच पारतंत्र्य ज्या समाजांतील प्रत्येक व्यक्तीस भोगावें लागते, व अधिक भोगावें लागत नाहीं, तो देश अत्यंत सुखी आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. ज्या मानाने ह्या आवश्यक पारतंत्र्याचा हिस्सा, असमतेनें पडूं लागतो, त्या मानानें अनवस्था, दु:ख, जुलूम व असंतोष, यांचा उद्भव होतो. आईबापांना मुलावर, नवऱ्याला बायकोवर, स्वामींना सेवकावर, व राजांना प्रजेवर, जों जों अधिकाधिक हक्क मिळत जातात, तों तो एका पक्षाला अयुक्त स्वातंत्र्य मिळत जातें, व दुसन्याच्या वाट्याला पारतंत्र्य येतें. आपलें मन एकाकडे ठेवून दुसन्याच्या तब्बेतीप्रमाणे वागावें लागणे, यांतच मोठें दुःख आहे. कित्येकदां असें होतें, कीं ज्याचें त्याला आपले हित बरोबर कळत नसतें, व दुसऱ्याने सांगितलेलें त्याला रुचत नसतें. या रीतीनें एकीकडून अज्ञान व दुसरीकडून परोपदेशतिरस्कार, यांचा घेरा पडून शेवटीं तो आपल्या कल्याणास मुकतो ! असें जरी आहे, तरी ज्याचें त्याला होईल तितके स्वातंत्र्य भोगूं देणेंच इष्ट आहे; कारण एकानें दुसन्याचे हित कशांत आहे हें शोधून काढण्यांत जितक्या चुका होण्याचा संभव आहे, त्यापेक्षां लक्षपटीने कमी चुका, ज्याचें त्यानें आपले हित कशांत आहे, हें शोधून काढण्यांत होणार आहेत. म्हणून राष्ट्राच्या राज्यरीितींत या गोष्टीकडे होईल तितके लक्ष देणें फार जरूर आहे.
 अनियंत्रित एकसत्ता मोडून तिच्या जागी बहुसत्ताक राज्यपद्धति स्थापणें, जिंकणाऱ्या राष्ट्रांचा अंमल झुगारून देणें, स्थानिक स्वराज्याचा अधिका- धिक विस्तार करणें, गुलामांचा व्यापार बंद करणें, स्त्रीपुरुष, स्वामिसेवक, गुरुशिष्य, राजाप्रजा -- यांच्यामधील संबंध होतील तितके अन्योन्यांच्या इच्छेवर आणून ठेवणें--- या सगळ्यांच्या मुळांशी वर निर्दिष्ट केलेले तत्त्व आहे. होईल तितके करून ज्याचें त्याला आपले काम मनाप्रमाणे करूं द्यावयाचें.
६ आ.