पान:Aagarakar.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

८६.

गोष्ट आपली आपल्यासच शांत वेळीं लाजिरवाणी वाटते, तिचें मिथ्या धर्माभिमानानें मंडण करणे आणि कांहीं मूर्ख लोकांनीं प्रसंगवशात् तिला धर्माधार लावून दिला असल्यामुळे तिचा त्याग करण्यास मिर्णे, हें खऱ्या धर्मश्रद्धेचें लक्षण नव्हे. शिमगा हा आमच्या धर्मावर फार मोठा डाग आहे. ख्रिस्ताच्या हातच्या चहाहूनहि फाल्गुनांतला सार्वजनिक विचकटपणा आणि त्वंपुरा विशेष गर्हणीय आहे; तेव्हां खुद्द श्रीने किंवा श्रीच्या प्रतिनिधींनी चहाप्रकरणांतून आपले लक्ष काढून घेऊन त्याचा मोर्चा या अश्लाघ्य दुराचाराकडे फिरविला तर फार चांगले होईल असें आम्हांस वाटतें ! पण सामान्य लोकांच्या धर्मकल्पनांहून त्याच्या-धर्माभि कान्यांच्या - धर्मकल्पना विशेष उन्नत असतील, असे मानणे म्हणजे समाज- शास्त्राचा विशेष परिचय नाहीं, असेंच व्यक्त करणें होय !
 त्याने जणूं काय विडाच उचलला चुकीचा आहे. कोणताहि आचार- असा या लोकांस समज कोणत्या सुधारकाविषर्थी कित्येकांचा असा समज झाला आहे की, जेवढे जुनें व हिंदु असेल तेवढे नादान ठरविण्याचा आहे ! आमच्या मतें हा समज फार विचार आम्हांस चांगला वाटत नाहीं, कारणामुळे झाला असेल हें त्याचें त्यासच ठाऊक. तथापि सणांच्या संबंधानें त्यांचा आमच्याविषयी गैरसमज न व्हावा म्हणून आम्ही स्पष्टपणे येथे हि सांगून ठेवतों कीं, शिमग्याचा सणं आम्हांस जितका तिरस्करणीय व त्याज्य वाटतो तितकाच दिवाळीचा सण अभिनंदनीय व रक्षणीय वाटतो. या सणांत आम्ही कसे वागतों याचा छडा कोठल्याहि चिकित्सक प्रवाशानें कितीहि काढला तरी आम्हांविषयीं त्याच्या मनांत तिरस्कार उत्पन्न होण्याची अणुमात्र भीति नाहीं. उलट अभ्यंगस्नाने, सुग्रास भक्षण, लक्ष्मीपूजन व जमाखर्चाचा आढावा, देण्याघेण्याचा निकाल, सौम्य व सुखदायक खेळ, दीपोत्सव व दारुकाम, बहिणभावंडांच्या भेटी आणि ओवाळण्या वगैरे गोष्टी कोणत्याहि प्रकारें लाजिरवाण्या नसून त्यामुळे आमच्या सांसारिक वृत्तीची व कुटुंबपद्धतीची रम्य बाजू प्रगट होते. या मंगल प्रकारांची शिमग्यांतील ओंगळ प्रकाराशी तुलना करा, आणि या प्रस्तुत लेखास दोष देणें योग्य वाटेल तर तो खुशाल द्या.